Gold Rate Today: सततच्या दरवाढीमुळे ग्राहकांसाठी आवाक्याबाहेर गेलेल्या सोन्या-चांदीच्या किमतींना रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर मोठा ब्रेक लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात असलेल्या चढ-उतारानंतर आज सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 तोळा दरात तब्बल 31600 रुपयांची घसरण झाली आहे, तर दुसरीकडे चांदीच्या दरातही मोठी कपात झाली आहे. त्यामुळे सणाच्या दिवशी बहीण किंवा भावासाठी दागिने अथवा भेटवस्तू खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी मानली जात आहे.
सोन्याचे कॅरेटनुसार आजचे ताजे दर
गुड रिटर्न्सने दिलेल्या आकडेवारीनुसार 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याच्या किमतींमध्ये झालेली घसरण खालीलप्रमाणे आहे:
– 24 कॅरेट सोनं: 1 तोळा (10 ग्रॅम) सोन्याच्या दरात 3160 रुपयांची घसरण झाली असून नवीन दर 159820 रुपये झाला आहे. तर 10 तोळा सोन्याचा भाव 31600 रुपयांनी घटून 1598200 रुपयांवर आला आहे.
– 22 कॅरेट सोनं: 1 तोळा सोन्याचा भाव 2900 रुपयांनी स्वस्त होऊन 146500 रुपये झाला आहे. तसेच 10 तोळा खरेदीसाठी ग्राहकांना 29000 रुपयांच्या सवलतीसह 1465000 रुपये मोजावे लागतील.
– 18 कॅरेट सोनं: 1 तोळा सोन्याचा दर 2370 रुपयांनी घटून 119870 रुपयांवर आला आहे. तर 10 तोळा सोन्याची किंमत 23700 रुपयांच्या घसरणीसह 1198700 रुपये झाली आहे.
चांदीच्या दरातही 5000 रुपयांची घसरण
सोन्यापाठोपाठ आज चांदी खरेदी करणेदेखील ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. 1 ग्रॅम चांदीच्या दरात 5 रुपयांची कपात झाली असून सध्या 1 ग्रॅम चांदीचा भाव 255 रुपये झाला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 1 किलो चांदीच्या दरात थेट 5000 रुपयांची मोठी घसरण नोंदवली गेली आहे. त्यामुळे आज बाजारात 1 किलो चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 255000 रुपये खर्च करावे लागतील.
सण-उत्सवाच्या काळात सराफा बाजारात गर्दीची शक्यता
गेल्या काही काळापासून वाढत्या किमतींमुळे ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली होती. मात्र, रक्षाबंधनाच्या दिवशी झालेल्या या दरकपातीमुळे सराफा बाजारात पुन्हा एकदा तेजी येण्याची आणि ग्राहकांची गर्दी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आज खरेदीला जाण्यापूर्वी या सुधारित दरांची नोंद घेणे ग्राहकांसाठी अत्यंत गरजेचे ठरेल.