Raksha Bandhan 2026 : यंदा रक्षाबंधन 27 की 28 ऑगस्टला? वाचा नेमका कधी आहे राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

रक्षाबंधन म्हणजे भावा-बहिणीच्या अतूट नात्याचा उत्सव. तर चला, जाणून घेऊ, यंदा रक्षाबंधनाची योग्य तिथी केव्हा आहे.

Raksha Bandhan 2026 : यंदा रक्षाबंधन 27 की 28 ऑगस्टला? वाचा नेमका कधी आहे राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनाचा हा सण भावा-बहिणीच्या अतूट प्रेमाचा, विश्वासाचा आणि सुरक्षेच्या वचनाचं प्रतीक मानला जातो. हिंदू मान्यतेनुसार, रक्षाबंधन (Raksha Bandhan) हा बहीण-भावांचा अतिशय पवित्र सण आहे. तसेच, तो संपूर्ण भारतात लोकप्रिय आहे. दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमा तिथीला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. हा सण भावा-बहिणीच्या अतूट प्रेमाचा, विश्वासाचा आणि सुरक्षेच्या वचनाचं प्रतीक मानला जातो. तर चला, जाणून घेऊ, यंदा रक्षाबंधनाची योग्य तिथी केव्हा आहे.

यंदा रक्षाबंधन कधी?
यंदा रक्षाबंधन 27 की 28 ऑगस्ट 2026 ला साजरे करण्यात येणार आहे याबाबत अनेकांना संभ्रम आहे. हिंदू पंचांगानुसार, श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा तिथी 27 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 वाजून 7 मिनिटांपासून सुरु होणार आहे. तर, 28 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 वाजून 49 मिनिटांपर्यंत ही तिथी असणार आहे. हिंदू मान्यतेनुसार उदय तिथीनुसार, 28 ऑगस्ट 2026 रोजी रक्षाबंधन साजरी केली जाणार आहे. 

रक्षाबंधनाचे धार्मिक महत्त्व आणि त्यामागील गोष्ट
श्रावण पौर्णिमेला साजरा केला जाणारा रक्षाबंधन हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि भावनिक सण आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करते. तर भाऊ बहिणीला तिच्या रक्षणाचे वचन देतो. मात्र, रक्षाबंधनाचा अर्थ केवळ भाऊ-बहिणीच्या नात्यापुरता मर्यादित नसून रक्षण, विश्वास, प्रेम आणि कर्तव्य यांचे प्रतीक म्हणूनही या सणाकडे पाहिलं जातं.

हेही वाचा – Tuljabhavani Temple: तुळजाभवानी मंदिरात पुरुषांना प्रवेशबंदी; ‘या’ एका तासात दर्शन बंद, जाणून घ्या कारण

रक्षाबंधनासंबंधी काही कथा सांगितल्या जातात. यापैकी श्रीकृष्ण आणि द्रौपदीची एक कथा आहे. तर, इंद्र आणि इंद्राणीची दुसरी कथा आहे.
1. श्रीकृष्ण आणि द्रौपदी
भगवान श्रीकृष्ण यांच्या बोटाला जखम झाल्यावर पांडवांची पत्नी द्रौपदी हिने आपल्या साडीचा तुकडा फाडून त्यांच्या बोटाला बांधला. त्या ऋणाची परतफेड म्हणून श्रीकृष्णांनी द्रौपदीचे चीरहरणाच्या वेळी रक्षण केले. त्यामुळे राखी हे केवळ धाग्याचे नव्हे, तर निःस्वार्थ प्रेम आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते.
2. इंद्र आणि इंद्राणी
पुराणानुसार, देव आणि दानव यांच्यातील युद्धात देवांचा पराभव होत होता. तेव्हा देवांची राणी इंद्राणी (शची) हिने मंत्रोच्चार करून एक पवित्र रक्षासूत्र तयार केले आणि ते इंद्राच्या मनगटावर बांधले. त्यानंतर इंद्राला विजय मिळाला. ही कथा रक्षाबंधनाच्या धार्मिक महत्त्वाशी जोडली जाते.

हेही वाचा – Shravan 2026: पवित्र श्रावण मास सुरू झालाय.. जाणून घ्या सण, श्रावणी सोमवार, शिवामूठ अन् धार्मिक महत्त्व 

(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number