PM Modi Speech : BRICS परिषदेत मोदींचं भाषण अचानक थांबलं, शी जिनपिंग यांच्याकडे पाहून म्हणाले…; पाहा VIDEO

भारत मंडपम येथे शनिवारी झालेल्या BRICS परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चक्क भाषण सुरु असताना काही वेळेसाठी ते थांबवलं होते. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे परिषदेदरम्यान अस्वस्थ दिसत असल

PM Modi Speech :  BRICS परिषदेत मोदींचं भाषण अचानक थांबलं, शी जिनपिंग यांच्याकडे पाहून म्हणाले…; पाहा VIDEO

भारत मंडपम येथे शनिवारी झालेल्या BRICS परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चक्क भाषण सुरु असताना काही वेळेसाठी ते थांबवलं होते. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे परिषदेदरम्यान अस्वस्थ दिसत असल्याचं मोदी यांच्या लक्षात आले आणि तेव्हाच त्यांच्याकडे पाहून ‘इज इट ओके’ अशी विचारणा केल्याचं सध्या समोर आलं आहे. हा सर्व प्रसंग दूरदर्शनच्या कॅमेऱ्यात कैद झालेला आहे.

नेमकं घडलं काय?
BRICS या परिषदेला सुरुवात झाल्यानंतर मोदी हे उद्घाटनपर भाषण करत होते. नेमके त्याचवेळी अचानक भाषण थांबवत जी जिनपिंग याची विचारपूस केली. मात्र, शी जिनपिंग नेमके कोणत्या कारणामुळे अस्वस्थ दिसते होते, हे सध्या स्पष्ट झालेलं नाही. दूरदर्शनने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हा सर्व प्रसंग भाषणाच्या साधारण 4 मिनिटे 30 सेंकद ते 5 मिनिटांच्या दरम्यान दिसून येतो.

हेही वाचा-Dattatray Bharane: दत्तात्रय भरणेंच्या तोंडून ‘दिवंगत उद्धव ठाकरे’ असा उल्लेख; इंदापूरच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?

या घटनेनंतर नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय बैठकही पार पडली. भारताच्या भूमीवर सात वर्षांनंतर दोन्ही नेत्यांची ही पहिली प्रत्यक्ष भेट होती. खरं तर यापूर्वी शी जिनपिंग यांनी 2019 मध्ये भारताचा दौरा केला होता. मुख्य म्हणजे, या बैठकीत भारत-चीन या संबंधावर चर्चाही करण्यात आली. दोन्ही दोशांनी आपल्या संबंधांकडे दीर्घकालीन आणि धोरणात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असल्याचं मोदी यांनी यात सांगितलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number