PM Kisan 22nd Installment: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM किसानचा 22वा हप्ता मार्चच्या ‘या’ तारखेला मिळण्याची शक्यता

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे

PM Kisan 22nd Installment: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM किसानचा 22वा हप्ता मार्चच्या ‘या’ तारखेला मिळण्याची शक्यता

PM Kisan 22nd Installment: देशातील लाखो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या पुढील हप्त्याबाबत मोठे अपडेट मिळत आहे. पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही अहवालांनुसार, हा हप्ता 13 मार्च रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होऊ शकतो.

पीएम किसान सन्मान निधी ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम वर्षभरात तीन समान हप्त्यांमध्ये म्हणजेच प्रत्येकी 2000 रुपये अशा स्वरूपात थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 21 हप्ते वितरित करण्यात आले आहेत आणि आता शेतकरी २२व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत.

मागील काही दिवसांपासून या हप्त्याबाबत चर्चा सुरू आहे. फेब्रुवारी महिन्यात हा हप्ता मिळेल अशी अपेक्षा अनेक लाभार्थ्यांनी व्यक्त केली होती. मात्र, फेब्रुवारी संपल्यानंतरही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे अनेक शेतकरी पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

हेही वाचा: Raju Shetti on Maharashtra Budget 2026 : 'पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा विश्वासघात…', कर्जमाफीच्या मुद्द्यावर राजू शेट्टींचा संताप

पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 मार्च रोजी आसाममधील कोकराझार येथे एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्याबाबत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या दिवशी देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2000 रुपये जमा होऊ शकतात, अशी माहिती विविध सूत्रांकडून दिली जात आहे. मात्र, याबाबत सरकारकडून अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

या योजनेचा लाभ देशभरातील सुमारे 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मिळत असल्याचे सांगितले जाते. शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या खर्चात मदत व्हावी आणि त्यांना आर्थिक आधार मिळावा, हा या योजनेमागील प्रमुख उद्देश आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांना त्यांचा हप्ता खात्यात जमा होणार आहे की नाही, हे ऑनलाइन पद्धतीने तपासण्याची सुविधा उपलब्ध आहे. यासाठी लाभार्थ्यांनी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपला स्टेटस तपासू शकतात.

हेही वाचा: Maharashtra Loan Waiver: राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, पण कोणाला मिळणार लाभ? वाचा

सर्वप्रथम pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जावे. त्यानंतर Know Your Status या पर्यायावर क्लिक करावे. पुढे आपला नोंदणी क्रमांक टाकावा. जर नोंदणी क्रमांक माहित नसेल, तर Know Your Registration Number या पर्यायावर क्लिक करून तो मिळवता येतो. त्यानंतर मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड भरल्यानंतर लाभार्थ्यांना त्यांच्या हप्त्याची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसू शकते.

पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता नेमका कधी येणार याबाबत अधिकृत घोषणा झाल्यानंतर स्पष्टता येणार आहे. मात्र, १३ मार्चची संभाव्य तारीख समोर आल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. जर सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडली, तर लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच २००० रुपयांचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number