पालघर जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समित्यांसाठी 7 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी 8 जानेवारीला होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या 57 जागांसाठी 361 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
तसेच पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार ,वाडा, मोखाडा, वसई या 8 पंचायत समित्यांसाठीच्या 114 जागांसाठी निवडणूक होणार आहे.
यासाठी एकूण 653 जणांनी अर्ज दाखल केले आहेत.
पालघर जिल्हा परिषदेत सध्या शिवसेना-भाजप-बहुजन विकास आघाडी या तिघांची सत्ता आहे.
पक्षीय बलाबल : एकूण जागा – 57
भाजप : 21
शिवसेना : 15
बविआ : 10
माकप : 5
राष्ट्रवादी काँग्रेस : 4
काँग्रेस : 1
अपक्ष : 1