पत्नीकडून पतीला पोटगी देण्याचे आदेश; औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय

पती-पत्नी यांच्या घटस्फोटानंतर पतीला आपल्या पत्नीला पोटगी द्यावी लागते. मात्र, घटस्फोटाबाबत औरंगाबाद खंडपीठाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. घटस्फोटाला मंजुरी मिळाल्यानंतर नोकरी करणाऱ्या पत्नीकडून बेरोजगार पतीला पोटगी मिळणार असल्याचा निर्णय औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. पत्नीपासून वेगळं राहणाऱ्या पतीला पत्नीने पोटगी द्यावी, या नांदेड दिवाणी न्यायालयाच्या निर्णयाला औरंगाबाद खंडपीठाने कायम ठेवले आहे. त्यामुळे या निर्णयानुसार, नोकरी करणाऱ्या […]

पत्नीकडून पतीला पोटगी देण्याचे आदेश; औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय

पती-पत्नी यांच्या घटस्फोटानंतर पतीला आपल्या पत्नीला पोटगी द्यावी लागते. मात्र, घटस्फोटाबाबत औरंगाबाद खंडपीठाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. घटस्फोटाला मंजुरी मिळाल्यानंतर नोकरी करणाऱ्या पत्नीकडून बेरोजगार पतीला पोटगी मिळणार असल्याचा निर्णय औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे.

पत्नीपासून वेगळं राहणाऱ्या पतीला पत्नीने पोटगी द्यावी, या नांदेड दिवाणी न्यायालयाच्या निर्णयाला औरंगाबाद खंडपीठाने कायम ठेवले आहे. त्यामुळे या निर्णयानुसार, नोकरी करणाऱ्या पत्नीला बेरोजगार पतीला तीन हजार रुपयांची पोटगी द्यावी लागणार आहे.

काय आहे प्रकरण?

याचिका दाखल करणारी पत्नी आणि पती यांचा विवाह १९९२मध्ये झाला होता. विवाहनंतर उच्च शिक्षित झाल्यानंतर पत्नीला सरकारी नोकरी मिळाली. त्यांनतर पत्नीने पतीकडून घटस्फोट घेण्यासाठी नांदेड दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यांचा घटस्फोटाचा अर्ज मान्य झाला. घटस्फोट झाल्यानंतर पतीने पोटगी, निर्वाह खर्च मिळण्यासाठी दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान, दिवाणी न्यायालयाने पतीच्या बाजूने निर्णय दिला. मात्र, न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. तर औरंगाबाद खंडपीठानेसुद्धा नांदेड दिवाणी न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number