Donald Trump Threat to Iran: ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी उघडा, अन्यथा विनाश अटळ…’; ट्रम्प यांचा इराणला धमकीवजा इशारा

ट्रम्प यांनी आपल्या 'Truth' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून थेट इशारा दिला असून, इराणचा सर्वनाश करण्याची धमकी दिली आहे.<br/>

Donald Trump Threat to Iran: ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी उघडा, अन्यथा विनाश अटळ…’; ट्रम्प यांचा इराणला धमकीवजा इशारा

Donald Trump Threat to Iran: इराणसोबत सुरू असलेल्या तीव्र लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. ट्रम्प यांनी इराणला स्पष्ट शब्दांत बजावले आहे की, जर त्यांनी वाटाघाटींचा मार्ग स्वीकारला नाही आणि जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) खुली केली नाही, तर त्यांना अत्यंत गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. ट्रम्प यांनी आपल्या ‘Truth’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून थेट इशारा दिला असून, इराणचा सर्वनाश करण्याची धमकी दिली आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेवर संकटाचे सावट
गेल्या 1 महिनाभरापासून सुरू असलेल्या या संघर्षामुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी तेल वाहतूक विस्कळीत झाल्याने हा संघर्ष जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत विनाशकारी ठरत आहे. दोन्ही बाजूंमध्ये समेट घडण्याची शक्यता अद्यापही धूसर असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर तणाव वाढत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी इराणने लवकरात लवकर एखादा करार करावा आणि व्यापारी मार्ग खुला करावा, अशी आग्रही मागणी केली आहे.

हेही वाचा – Middle East Conflict: मध्यपूर्वेतील युद्धात भारतीयांचा बळी; धक्कादायक आकडा समोर, अजूनही 1 कोटी भारतीयांचा जीव धोक्यात

संघर्षाची पार्श्वभूमी आणि पुढील दिशा
अमेरिकेने इराणवर लादलेले निर्बंध आणि त्यानंतर इराणने दिलेला प्रत्युत्तर यामुळे हे युद्धजन्य संकटात भर पडली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या पोस्टद्वारे इराणला शेवटची संधी असल्याचे सुचवले आहे. जर राजनैतिक चर्चा अयशस्वी ठरली, तर अमेरिका लष्करी बळाचा वापर करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असे संकेत या इशाऱ्यातून मिळत आहेत. आता इराण यावर काय भूमिका घेतो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number