छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पामधील एक प्रकल्प म्हणून राधानगरी धरणाचा समावेश होतो. कोल्हापूर संस्थानमधील पाण्याचा प्रश्न मिटावा यासाठी राजश्री शाहू महाराजांनी हा महत्त्वकांक्षी प्रकल्प उभारण्याचा निश्चय केला. यामुळेच इतक्या वर्षानंतरही हे धरण संपूर्ण कोल्हापूरची तहान भागवत आहे. हे पर्यटन स्थळ पाहण्यासाठी पर्यटक आता गर्दी करू लागले आहेत.
महाराष्ट्रातील एक अतिशय भक्कम धरण म्हणून राधानगरी धरणाला ओळखले जाते. सध्या या धरणातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे येथील एक ऐतिहासिक ठिकाण पर्यटनासाठी खुले झाले आहे. ‘बेनजर व्हीला’ असे या ऐतिहासिक ठिकाणाचे नाव आहे. १९१० ला या धरणाच्या प्रत्यक्ष कामाची सुरुवात झाली. तेव्हाच या धरणाच्या मधोमध असलेल्या छोट्या बेटावर अतिशय देखणी अशी एक वास्तू उभारण्यात आली. धरण बांधकाम देखरेखीखाली राहावे यासाठी अनेकवेळा शाहू महाराज स्वतः याठिकाणी वास्तव्यासाठी असायचे.
महाराष्ट्रातील एक अतिशय भक्कम धरण म्हणून राधानगरी धरण ओळखले जाते. सध्या या धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्याने येथील ऐतिहासिक ठिकाण पर्यटनासाठी खुले झाले आहे. ‘बेनजर व्हिला’ असे या ऐतिहासिक ठिकाणाचे नाव असून हे पर्यटन स्थळ पाहण्यासाठी पर्यटक आता गर्दी करू लागले आहेत.