Nepal Bihar Flood Contaminated Fish Warning: नेपाळमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या भीषण महापुराचा मोठा फटका उत्तर भारतातील बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांना बसला आहे. पुराच्या प्रचंड प्रवाहाबरोबर नेपाळमधील नद्यांमधून वेगळ्याच प्रजातीचे आणि अपरिचित मासे बिहारच्या सीमावर्ती भागांमधील नद्यांमध्ये वाहून आले आहेत. बिहारमधील बागहा जिल्ह्यात वाहून आलेले हे मासे पकडून नागरिकांनी त्याचे सेवन केले. मात्र, हे मासे खाल्ल्यानंतर काही वेळातच अनेक लोकांना उलट्या, अतिसार आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
बिहार सरकारचा गंभीर इशारा; 31 ऑगस्टला जाहीर केल्या मार्गदर्शक सूचना
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बिहार सरकारच्या दुग्ध, मत्स्य आणि पशुधन विभागाने 31 ऑगस्ट रोजी तात्काळ अधिकृत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. बागहाच्या उपविभागीय दंडाधिकारी (SDM) चांदणी कुमारी यांनी नागरिकांना पुराच्या पाण्यातून आलेले कोणतेही मासे न खाण्याचे आवाहन केले आहे. पुराच्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर कचरा, रसायने आणि मृत जनावरांचे अवशेष मिसळलेले असतात. यामुळे पाण्यातील जीवाणू, विषाणू आणि बुरशीजन्य संसर्गामुळे हे मासे अत्यंत विषारी व दूषित झाले असण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
⚠️ ????? ????. ??????? ?????? ??????? ????????? ???? ?????? ???? ??????????? Amid floods in Nepal and rising river levels in Bihar, the Animal and Fisheries Resources Department advises people not to buy, sell or… pic.twitter.com/sTI6jJjhkO — All India Radio News (@airnewsalerts) September 1, 2026
संसर्गजन्य आजारांचा धोका; आरोग्य केंद्रात धाव घेण्याचे आवाहन
प्रशासनाने जारी केलेल्या सतर्कतेच्या इशारानुसार, जर कोणी असे मासे खाल्ले असतील आणि त्यांना चक्कर येणे, उलट्या होणे, पोटात तीव्र वेदना किंवा श्वसनाचा त्रास यांसारखी कोणतीही असामान्य लक्षणे जाणवत असतील, तर त्यांनी अजिबात वेळ न दवडता तातडीने जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात उपचार घ्यावेत. जोपर्यंत नद्यांमधील पाण्याच्या प्रवाहाची आणि गुणवत्तेची पातळी पूर्ववत होत नाही, तोपर्यंत स्थानिक जलाशयांतून मासे पकडणे आणि ते खाणे पूर्णपणे बंद ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
चीन से बहकर नेपाल के रास्ते बिहार पहुंच रही हैं विशालकाय मछलिया.! ? बाल्मीकि नगर बैराज में अचानक बड़ी-बड़ी मछलियां आई हैं, जिसे देखकर लोग हैरान हो जा रहे हैं..? pic.twitter.com/PjxZwOcULS — Sanjay Gupta ?? (@sanjukgupta1987) August 31, 2026
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; माशांच्या प्रजातीबाबत भीतीचे वातावरण
दुसरीकडे, बिहारमधील नद्यांमध्ये वाहून आलेले हे अजस्र मासे पकडण्यासाठी नागरिकांनी केलेली गर्दी दर्शवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. एका युझरने असाही दावा केला आहे की, हे मासे स्मशानघाटाजवळील पाण्यात वाढणारे असून अर्धवट जळालेले मृतदेह खाऊन मोठे होतात, त्यामुळे ते खाण्यास अयोग्य आहेत. तथापि, प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्यास सांगितले असून, असे कोणतेही अनोखे किंवा विचित्र मासे आढळल्यास त्याची त्वरित माहिती जिल्हा मत्स्य व्यवसाय अधिकाऱ्यांना देण्याचे निर्देश दिले आहेत.
Thousands of corpse-eating fish of the Trishuli River, known there by the name Goonch Catfish have reached Bihar with the flood waters . These are large, lazy fish that resides in the river near the cremation ghats built along the riverbank and feeds on half-burnt corpses, which… pic.twitter.com/AQGne4dxuo — Amitabh Chaudhary (@MithilaWaaala) August 31, 2026
सीमावर्ती भागात आरोग्य पथके तैनात; परिस्थितीवर प्रशासनाची नजर
उत्तर प्रदेशातील नद्यांमध्ये नेपाळहून वाहून आलेले मृतदेह आढळले असतानाच बिहारमध्ये विषारी माशांमुळे नागरिक आजारी पडल्याने दोन्ही राज्यांत भीतीचे सावट पसरले आहे. बागहा आणि आसपासच्या सीमावर्ती भागात आरोग्य विभाग आणि मत्स्य विभागाची पथके तैनात करण्यात आली आहेत. पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी ध्वनिवर्धकावरून (Loudspeakers) जागृती केली जात असून, या दूषित माशांची विक्री बाजारात होणार नाही याची खबरदारी स्थानिक प्रशासनाकडून घेतली जात आहे.
हेही वाचा – Nepal Flood: नेपाळमध्ये पुराचा हाहाकार! एकाच घरात सापडले तब्बल 23 मृतदेह; आईच्या कुशीत लेकीने सोडले प्राण