Nepal Flood Gold Theft: संतापजनक! निसर्गाच्या कोपानंतर दुर्दैवी लोकांच्या बेवारस पडलेल्या मृतदेहांवरील दागिने चोरण्याचा निंद्य प्रकार; व्हिडिओनंतर दोन नराधमांना बेड्या

भोटेकोशी आणि नारायणी नदीच्या किनाऱ्यावर वाहून आलेल्या मृतदेहावरून दोन तरुण सोन्याचे दागिने काढून घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली.

Nepal Flood Gold Theft: संतापजनक! निसर्गाच्या कोपानंतर दुर्दैवी लोकांच्या बेवारस पडलेल्या मृतदेहांवरील दागिने चोरण्याचा निंद्य प्रकार; व्हिडिओनंतर दोन नराधमांना बेड्या

Nepal Flood Gold Theft from Dead Bodies: नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरामुळे संपूर्ण देशात हाहाकार उडाला असून गावेच्या गावे पाण्याखाली गेली आहेत. शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण अजूनही बेपत्ता आहेत. लोक आपापले संसार सावरण्यासाठी धडपड करत असताना आणि एकमेकांना धीर देत असतानाच दुसरीकडे माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून आलेल्या एका दुर्दैवी महिलेच्या बेवारस मृतदेहाच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरल्याची घटना उघडकीस आली आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ प्रचंड व्हायरल, पोलिसांकडून तातडीने शोधमोहीम  
भोटेकोशी आणि नारायणी नदीच्या किनाऱ्यावर वाहून आलेल्या मृतदेहावरून दोन तरुण सोन्याचे दागिने (कानपट्ट्या/ईअररिंग्स) काढतानाचा व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल झाला. हा 41 सेकंदांचा व्हिडिओ समोर येताच नेपाळसह जगभरातून तीव्र संताप व्यक्त केला गेला. या दोन्ही नराधमांना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी स्थानिकांनी लावून धरली होती. व्हिडिओ फुटेजच्या आधारे चितवन पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवून शोधमोहीम राबवली.

हेही वाचा – Nepal Flood : नेपाळचा मोठा निर्णय! भारत आणि अमेरिकेची मदत पथकं नाकारली; म्हणाला, ‘आम्ही आपत्ती हाताळण्यास…’

दोघे नराधम आरोपी अखेर अटकेत  
नेपाळ पोलिसांनी चितवन जिल्ह्यातील भरतपूर भागातून मदन गुरुंग (25 वर्षे) आणि उमेश चौधरी (38 वर्षे) या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. महापुराच्या आपत्तीत सापडलेल्या आणि प्राण गमावलेल्या पीडितांच्या मृतदेहांचा अवमान करणाऱ्या किंवा लुटमार करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही, असा कडक इशारा पोलिसांनी दिला आहे. या दोन्ही आरोपींविरोधात विविध कलमांखाली कडक कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.  

चितवनमध्ये विदारक परिस्थिती; पोलिसांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
नारायणी आणि त्रिशुली नद्यांच्या पात्रात आतापर्यंत 64 पेक्षा जास्त मृतदेह आढळून आले असून स्थानिक रुग्णालयातील मृतदेहागारामध्ये जागाही शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे तात्पुरत्या तंबूंची उभारणी करून मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम प्रशासन करत आहे. या गंभीर परिस्थितीत नेपाळ पोलीस आणि प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, पुराच्या काळात मृतदेहांबाबत असा कोणताही अमानुष किंवा गुन्हेगारी प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.

हेही वाचा – Nepal Floods: नेपाळमध्ये जलप्रलयाचा हाहाकार! 392 जणांचा मृत्यू, 1500 हून अधिक बेपत्ता; महाराष्ट्रातील 114 नागरिक संकटात

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number