नागपूर दुर्घटनेबद्दल फडणवीसांकडून शोक

नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यात जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. सततच्या पावसाने नदी-नाले तुडूंब भरून वाहत असून अनेक ठिकाणी पूर परिस्थीती निर्माण झाली आहे. इसासनी परिसरातील नाल्याला आलेल्या पुरात माय-लेकी वाहून गेल्याची घटना समोर आली होती. ही दुर्घटना ताजी असतानाच, आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सावनेर तालुक्यात एका नाल्यावरून ७ जण […]

नागपूर दुर्घटनेबद्दल फडणवीसांकडून शोक

नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यात जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. सततच्या पावसाने नदी-नाले तुडूंब भरून वाहत असून अनेक ठिकाणी पूर परिस्थीती निर्माण झाली आहे. इसासनी परिसरातील नाल्याला आलेल्या पुरात माय-लेकी वाहून गेल्याची घटना समोर आली होती. ही दुर्घटना ताजी असतानाच, आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सावनेर तालुक्यात एका नाल्यावरून ७ जण गाडीसहित वाहून गेल्याची दुर्घटना घडली आहे. यातील तीन जणांचे मृतदेह सापडले असून या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सावनेर तालुक्यातील नांदा ते छत्रपूर दरम्यानच्या नाल्यावरून पाणी वाहत असताना गाडी काढण्याच्या नादात ती गाडी ७ जणांसह पुराच्या पाण्यात वाहून गेले. त्या स्कॉर्पिओमध्ये तीन महिला, दोन पुरुष, १० वर्षाचा मुलगा व वाहनचालक असे एकूण सात जण असल्याची तसेच यातील दोन महिला व एका एक पुरुष अशा तिघांचे मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती आहे. ते सर्व जण मुरुड, ता. मुलताई, जिल्हा बैतूल येथील रहिवासी आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून आपण नागपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचंही त्यांनी म्हंटले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number