Apple Layoffs: ॲपलमध्ये पुन्हा नोकरकपात; Siri अन् Vision Pro टीममधील 200 हून अधिक कर्मचाऱ्यांना डच्चू

कंपनीने आपल्या 'सिरी' (Siri) डिजिटल असिस्टंट आणि 'व्हिजन प्रो' (Vision Pro) हेडसेट विभागातील तब्बल 200 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामवरून कमी केले आहे.

Apple Layoffs: ॲपलमध्ये पुन्हा नोकरकपात; Siri अन् Vision Pro टीममधील 200 हून अधिक कर्मचाऱ्यांना डच्चू

Apple Layoffs:  तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी 'ॲपल इंक' आपल्या तंत्रज्ञानात मोठे बदल करत असून, त्याचा फटका कर्मचाऱ्यांना बसला आहे. कंपनीने आपल्या 'सिरी' (Siri) डिजिटल असिस्टंट आणि 'व्हिजन प्रो' (Vision Pro) हेडसेट विभागातील तब्बल 200 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामवरून कमी केले आहे. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग अंतर्गत येणाऱ्या 'इंटेलिजंथ सिस्टम्स एक्सपिरियन्स' (Intelligent Systems Experience) या मुख्य एआई (AI) वैशिष्ट्यांवर काम करणाऱ्या टीममधील पदांचाही यामध्ये समावेश आहे.

व्हिजन प्रो आणि गेमिंग विभागाला मोठा फटका

ॲपलने 'व्हिजन प्रो'साठी विशेष गेमिंग बनवणाऱ्या टीमचे कामकाज मोठ्या प्रमाणावर थांबवले आहे. याशिवाय, या उपकरणासाठी 'इमर्सिव्ह व्हिडिओ' सामग्री तयार करणाऱ्या विभागाचा आकारही लक्षणीयरीत्या लहान करण्यात आला आहे. व्हिजन प्रोच्या एकूण टीममधून जवळपास 100 पदे, तर सिरी आणि सॉफ्टवेअर विभागातून उरलेली 100 पदे रद्द करण्यात आली आहेत. उच्च निर्मिती खर्च आणि ग्राहकांची मर्यादित संख्या यामुळे कंपनीने हे पाऊल उचलल्याचे दिसते.

'इमर्सिव्ह व्हिडिओ' निर्मितीचा खर्च आणि आव्हाने

'व्हिजन प्रो'च्या विक्रीसाठी 3डी 'इमर्सिव्ह व्हिडिओ' हे एक अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जात होते. मात्र, याचा एक भाग (एपिसोड) शूट करण्यासाठी लाखो डॉलर्सचा प्रचंड खर्च येतो आणि यासाठी कर्मचारी व कंत्राटदारांच्या अनेक टीम्सची आवश्यकता भासते. सध्या व्हिजन प्रो वापरकर्त्यांची संख्या तुलनेने कमी असल्याने या खर्चाचा फटका कंपनीच्या व्यवसायावर बसत होता.

AI आणि आगामी आव्हानांनुसार टीम्सची पुनर्रचना

सिरी आणि एआय तंत्रज्ञानामध्ये आगामी काळात मोठे अद्ययावत बदल केले जाणार आहेत. यासाठी नवीन कौशल्यांची आवश्यकता असल्याने ॲपलने काही जुनी पदे रद्द करून नवीन पदांची निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. 'इंटेलिजंट सिस्टम्स एक्सपिरियन्स' टीममधील बदल हे कंपनीच्या नवीन एआय प्राधान्यक्रमांशी जुळवून घेण्यासाठी केले जात आहेत. त्याचप्रमाणे, ग्राहकांचा व्हिजन प्रो वापरण्याचा पॅटर्न लक्षात घेऊन संसाधनांचे योग्य फेरवाटप केले जात असल्याचे कर्मचाऱ्यांना स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा – PM Modi cabinet: कॅबिनेट बैठकीत मंत्र्यांची ‘सोशल मीडिया टेस्ट’! डिजिटल रिपोर्ट कार्डमधून समोर आली कामगिरी; कोण ठरलं अव्वल, कोण पिछाडीवर?

व्हिजन प्रो आणि visionOS बाबत महत्त्वाची माहिती

या नोकरकपातीमुळे व्हिजन प्रो किंवा त्याची 'visionOS' ऑपरेटिंग सिस्टम बंद होणार नाही, असे ॲपलने स्पष्ट केले आहे. 'ॲपल इमर्सिव्ह व्हिडिओ' पूर्णपणे थांबवण्याऐवजी कंपनी आता स्वतः कमी व्हिडिओ बनवून त्रयस्थ (third-party) कंपन्यांना सामग्री तयार करण्यासाठी प्रोत्साहन देणार आहे. 2028 च्या अखेरीस व्हिजन प्रोचे नवीन मॉडेल बाजारात आणण्याची ॲपलची योजना आहे. व्यवसायातील या बदलांविषयी बोलताना ॲपलने सांगितले की, कंपनीच्या धोरणात्मक पुनर्रचनेमुळे काही पदे रद्द होत असली, तरी नवीन नोकऱ्यांच्या संधीही निर्माण होत आहेत. बाधित कर्मचाऱ्यांना ॲपलमध्येच इतर उपलब्ध पदांवर अर्ज करण्यासाठी मदत केली जात आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number