Advance Tip Ban : कॅब बुकिंगबाबत सरकारचा मोठी निर्णय; ‘प्री-राइड टिपिंग’वर बंदी; ॲग्रीगेटर्सना दिले ‘हे’ महत्त्वाचे निर्देश

प्रवासापूर्वीच चालकांना 'ॲडव्हान्स टिप' (अग्रिम बक्षीस) देण्यास किंवा टिप देण्यासाठी दबाव टाकणाऱ्या सुविधांवर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) पूर्णपणे बंदी घातली आहे.

Advance Tip Ban : कॅब बुकिंगबाबत सरकारचा मोठी निर्णय; ‘प्री-राइड टिपिंग’वर बंदी; ॲग्रीगेटर्सना दिले ‘हे’ महत्त्वाचे निर्देश

Advance Tip Ban : कॅब आणि ऑटो बुकिंग ॲप्स वापरणाऱ्या प्रवाशांसाठी केंद्र सरकारने अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. प्रवासापूर्वीच चालकांना 'ॲडव्हान्स टिप' (अग्रिम बक्षीस) देण्यास किंवा टिप देण्यासाठी दबाव टाकणाऱ्या सुविधांवर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) पूर्णपणे बंदी घातली आहे. सरकारने सर्व कॅब ॲग्रीगेटर्सना आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून प्रवासापूर्वी 'टिप' मागण्याचे पर्याय तातडीने हटवण्याचे निर्देश दिले आहेत.

'ॲडव्हान्स टिप' आणि 'ॲड-ऑन' पर्यायांवर आक्षेप

11 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या अधिकृत निर्देशात मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, अनेक राईड-ॲग्रीगेटर ॲप्स बुकिंगच्या वेळीच 'ॲडव्हान्स टिप' किंवा 'चूज ॲन ॲड-ऑन' (अतिरिक्त पर्याय) यांसारखे मेसेज दाखवत होते. अधिक पैसे किंवा 'टिप' दिल्यास ड्रायव्हरकडून राईड स्वीकारली जाण्याची शक्यता वाढेल, असा आभास या संदेशांमधून निर्माण केला जात होता. सरकारच्या मते, अशा प्रकारची कार्यपद्धती ही 'मोटर वाहन ॲग्रीगेटर मार्गदर्शक तत्त्वे, 2025' चे थेट उल्लंघन आहे. त्यामुळे सर्व ॲप्सनी आपल्या डिजिटल इंटरफेसचे पुनरावलोकन करून हे पर्याय त्वरित काढून टाकावेत, असा सक्त आदेश देण्यात आला आहे.

'टिप' आता केवळ प्रवास संपल्यानंतरच; दबाव तंत्र होणार बंद

नवीन नियमांनुसार, 'टिप' देणे हे पूर्णपणे प्रवाशाच्या इच्छेवर (ऐच्छिक) अवलंबून असेल. जर एखाद्या प्रवाशाला ड्रायव्हरच्या सेवेवर खूश होऊन टिप द्यायची असेल, तर ती केवळ प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतरच देता येईल. कॅब बुक करताना, प्रवास सुरू होण्यापूर्वी किंवा प्रत्यक्ष प्रवासादरम्यान 'टिप' मागण्याचा कोणताही पर्याय ॲपवर उपलब्ध नसेल. यामुळे ग्राहकांवर आगाऊ पैसे भरण्यासाठी येणारा मानसिक दबाव आता पूर्णपणे थांबणार आहे.

हेही वाचा – Parliament Adjourned: अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांचा गोंधळ; अमित शाह यांच्या निवेदनाआधीच लोकसभेचं कामकाज तहकूब, नेमकं काय घडलं?

राईड कन्फर्मेशनशी 'टिप'चा संबंध जोडण्यास मनाई

'टिप' दिल्यामुळे कॅब लवकर कन्फर्म होईल, ड्रायव्हर पटकन मिळेल, वेटिंग टाईम कमी होईल किंवा उत्तम सेवा मिळेल, असा कोणताही दावा किंवा मेसेज ॲप्सना दाखवता येणार नाही. 'टिप'ला राईडची पुष्टी किंवा सेवेच्या दर्जाशी जोडणे बेकायदेशीर मानले जाईल. सरकारच्या या निर्णयामुळे कॅब बुकिंग क्षेत्रातील पारदर्शकता वाढणार असून, प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक आणि गैरसोय थांबण्यास मोठी मदत होणार आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number