Lockdown News: भारताच्या शेजारील देशावर मोठं संकट; ‘या’ कारणामुळे लागणार कडक लॉकडाऊन

या धोरणांतर्गत रात्री 8 नंतर सर्व व्यावसायिक बाजारपेठा, शॉपिंग मॉल्स आणि कार्यक्रम स्थळे कडकपणे बंद ठेवण्याचा विचार सुरू आहे.<br/>

Lockdown News: भारताच्या शेजारील देशावर मोठं संकट; ‘या’ कारणामुळे लागणार कडक लॉकडाऊन

Lockdown News: पश्चिम आशियातील (आखाती देश) वाढत्या लष्करी संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर ऊर्जेचे मोठे संकट निर्माण झाले आहे. याचा सर्वात मोठा आणि घातक फटका भारताचा शेजारी देश असलेल्या पाकिस्तानला बसला आहे. कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित झाल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर प्रचंड वाढल्याने पाकिस्तानच्या परकीय चलन साठ्यावर कमालीचा ताण आला आहे. ही बिकट आर्थिक स्थिती सावरण्यासाठी आणि देशांतर्गत इंधनाची बचत करण्यासाठी पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील सरकार आता संपूर्ण देशात 'पेट्रोलियम स्मार्ट लॉकडाऊन' लागू करण्याच्या तयारीत आहे. या धोरणांतर्गत रात्री 8 नंतर सर्व व्यावसायिक बाजारपेठा, शॉपिंग मॉल्स आणि कार्यक्रम स्थळे कडकपणे बंद ठेवण्याचा विचार सुरू आहे.

आठवड्यातून केवळ 4 दिवसच कामकाज 

पाकिस्तान सरकारकडून इंधनाचा खप कमी करण्यासाठी विविध आपत्कालीन उपायांवर गांभीर्याने चर्चा केली जात आहे. प्रस्तावित आराखड्यानुसार, सरकारी आणि खासगी दोन्ही क्षेत्रांतील कार्यालयांसाठी आठवड्यातून केवळ 4 दिवसच कामाचे ठेवले जाण्याची शक्यता आहे. उर्वरित शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे 3 दिवस साप्ताहिक सुट्टी किंवा 'वर्क फ्रॉम होम' म्हणून घोषित केले जाऊ शकतात, जेणेकरून रस्त्यांवरील वाहनांची वर्दळ कमी होऊन पेट्रोल-डिझेलची बचत होईल. याशिवाय, पेट्रोल पंपांवर इंधन विक्रीसाठी विशिष्ट दिवसांची मर्यादा घालणे आणि सरकारी वाहनांच्या वापरावर निर्बंध आणणे अशा कठोर पावलांचाही या योजनेत समावेश आहे.

हेही वाचा – इथे लहान मुलांच्या 'डायपर्स'पेक्षा वृद्धांच्या 'डायपर्स'ची विक्री जास्त; 100 वर्षांहून जास्त जगणाऱ्या 'या' देशात ज्येष्ठांची संख्या एक लाख पार, अहवालातून समोर

अर्थव्यवस्था कोलमडण्याच्या उंबरठ्यावर 

आधीच महागाई आणि आर्थिक मंदीचा सामना करणाऱ्या पाकिस्तानसाठी हे नवीन ऊर्जा संकट अधिकच आव्हानात्मक ठरणार आहे. इंधनाचा साठा वेगाने संपत असल्याने आणि आयात करणे परवडत नसल्यामुळे पाकिस्तानच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने तातडीची बैठक घेऊन या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. जर हा 'स्मार्ट लॉकडाऊन' लागू झाला, तर पाकिस्तानच्या व्यापारी क्षेत्रावर आणि सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनावर त्याचा अत्यंत विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number