Smartphone Manufacturing : मेक इन इंडियाला मोठे बळ! ‘ही’ कंपनी भारतात करणार वनप्लस, ओप्पो अन् रिअलमीच्या फोन्सची निर्मिती

पहिल्याच वर्षी सुमारे 80 लाख स्मार्टफोन्स बनवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, दुसऱ्या वर्षापर्यंत ही क्षमता 1.5 ते 1.6 कोटी युनिट्सपर्यंत वाढवण्याची आखणी करण्यात आली आहे.<br/>

Smartphone Manufacturing : मेक इन इंडियाला मोठे बळ! ‘ही’ कंपनी भारतात करणार वनप्लस, ओप्पो अन् रिअलमीच्या फोन्सची निर्मिती

Smartphone Manufacturing : भारतातील प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी 'अंबर एंटरप्रायझेस इंडिया' (Amber Enterprises India) आता स्मार्टफोन क्षेत्रात मोठी भरारी घेण्याच्या तयारीत आहे. चीनमधील आघाडीच्या ओप्पो (Oppo), वनप्लस (OnePlus) आणि रिअलमी (Realme) या तीन लोकप्रिय ब्रँड्ससाठी अंबर एंटरप्रायझेस भारतातच मोबाईल निर्मिती करणार आहे. कंपनीचे सीईओ जसबीर सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, FY 2026-27 च्या चौथ्या तिमाहीत याचे प्रायोगिक उत्पादन सुरू होईल, तर FY 2027-28 च्या पहिल्या तिमाहीपासून प्रत्यक्ष व्यावसायिक उत्पादन वेगाने सुरू केले जाईल. पहिल्याच वर्षी सुमारे 80 लाख स्मार्टफोन्स बनवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, दुसऱ्या वर्षापर्यंत ही क्षमता 1.5 ते 1.6 कोटी युनिट्सपर्यंत वाढवण्याची आखणी करण्यात आली आहे.

चीनी कंपन्यांचा 'ॲसेट-लाइट' मॉडेलवर भर; अंबर उभारणार स्वतःचा प्लांट
ओप्पो मोबाईल्स इंडियासोबत झालेला हा करार देशातील 'मेक इन इंडिया' मोहिमेला बळकटी देणारा ठरणार आहे. चिनी स्मार्टफोन कंपन्या आता स्वतः कारखाने चालवण्याऐवजी उत्पादनाची जबाबदारी स्थानिक भारतीय कंपन्यांकडे सोपवून 'ॲसेट-लाइट' मॉडेलचा अवलंब करत आहेत. दरम्यान, कॉपर-क्लॅड लॅमिनेट्सच्या (CCL) किमती वाढल्यामुळे पीसीबी (PCB) व्यवसायाच्या मार्जिनवर काही प्रमाणात दबाव आला असला, तरी कंपनीने यावर उपाय म्हणून FY 2029-30 पर्यंत स्वतःचा स्वस्त सीसीएल (CCL) प्लांट उभारण्याची महत्त्वपूर्ण योजना आखली आहे.

हेही वाचा – Sheikh Hasina Extradition: भारत शेख हसीना यांचे प्रत्यर्पण करणार? बांगलादेशसोबत पडद्यामागून चर्चा; मात्र, अंतिम निर्णय भारतीय न्यायालयाचा

भारतीय स्मार्टफोन बाजारातील स्थान आणि भक्कम वाटा
मोबाईल निर्मितीचा हा व्यवसाय सुरळीत चालवण्यासाठी अंबर एंटरप्रायझेसने आधीच एका नव्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसरची (COO) नियुक्ती केली आहे. 'काउंटरपॉइंट रिसर्च'च्या Q2 2026 च्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये विवो (Vivo) 17.8 टक्क्यांसह अव्वल तर सॅमसंग (Samsung) 17.6 टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे. ओप्पो (Oppo) 13.6 टक्क्यांसह बाजारहिश्श्यासह तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, ओप्पो, रिअलमी, वनप्लस आणि आयकू (iQOO) या सर्व समूहांचा एकत्रित विचार केल्यास देशातील एकूण स्मार्टफोन बाजारातील त्यांचा वाटा तब्बल 45.6 टक्के इतका प्रचंड आहे, ज्यामुळे अंबर एंटरप्रायझेसला या कराराचा मोठा फायदा होणार आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number