LPG Cylinder: केंद्राचा मोठा निर्णय! आता 45 दिवसांचा नियम रद्द; फक्त इतक्या दिवसांत नवा सिलिंडर बुक करता येणार

केंद्र सरकारने घरगुती एलपीजी (LPG) सिलिंडर रिफिल बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा आणि दिलासादायक बदल केला आहे.

LPG Cylinder: केंद्राचा मोठा निर्णय! आता 45 दिवसांचा नियम रद्द; फक्त इतक्या दिवसांत नवा सिलिंडर बुक करता येणार

LPG refill booking 25 days rule: केंद्र सरकारने घरगुती एलपीजी (LPG) सिलिंडर रिफिल बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा आणि दिलासादायक बदल केला आहे. आता ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व ग्राहकांसाठी सिलिंडर बुकिंगचा कालावधी समान करण्यात आला आहे. या नव्या निर्णयानुसार, ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी पुढील सिलिंडर बुक करण्याचा कालावधी 45 दिवसांवरून कमी करून थेट 25 दिवस करण्यात आला आहे.

मध्य-पूर्वेतील संकट अन् सिलिंडर पुरवठ्यातील सुधारणा
मध्य-पूर्वेत (West Asia) निर्माण झालेल्या लष्करी तणावामुळे एलपीजीच्या जागतिक पुरवठ्यावर मोठा ताण निर्माण झाला होता. त्यावेळी पुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी सरकारने शहरी भागासाठी 25 दिवस आणि ग्रामीण भागासाठी 45 दिवसांचा बुकिंग कालावधी तात्पुरत्या स्वरूपात लागू केला होता. मात्र, आता एलपीजीचा पुरवठा सुरळीत झाला असून प्रलंबित बॅकलॉग (Backlog) मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. त्यामुळे सरकारने हा जुना निर्बंध हटवून दोन्ही क्षेत्रांना समान न्याय दिला आहे.

हेही वाचा – IAS Neha Marvya: IAS अधिकारी यांच्या बदली होण्याच्या मालिका सुरूच…. 50 दिवसांत बदली, कोण आहेत IAS अधिकारी नेहा मारव्या सिंह?

पेट्रोलियम मंत्रालयाचे तेल कंपन्यांना तात्काळ अंमलबजावणीचे आदेश
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी सोमवारी (7 September 2026) या निर्णयाची अधिकृत माहिती दिली. इंडियन ऑइल (IOCL), भारत पेट्रोलियम (BPCL) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम (HPCL) या सर्व प्रमुख तेल विपणन कंपन्यांना (OMCs) या सुधारित नियमांची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयाशी संबंधित पत्राची प्रतही सोशल मीडियावर सामायिक करण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील कोट्यवधी कुटुंबांना मोठा दिलासा
या निर्णयामुळे विशेषतः ग्रामीण भागातील संयुक्त कुटुंबे आणि अधिक गॅस वापर असणाऱ्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. आधी एका सिलिंडरनंतर दुसरा सिलिंडर बुक करण्यासाठी 45 दिवस वाट पाहावी लागत असल्याने अनेक कुटुंबांची गैरसोय होत होती. आता शहर असो वा गाव, कोणताही घरगुती एलपीजी ग्राहक आधीचा सिलिंडर घेतल्यावर 25 दिवसांचा कालावधी पूर्ण होताच पुढील रिफिल सहज बुक करू शकेल.

हेही वाचा – Flight Emergency Landing: 36,000 फूट उंचीवर असताना इंजिनातून ‘तो’ अलर्ट; एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचे कोची येथे इमर्जन्सी लँडिंग

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number