Ram Mandir CEO पदी निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा निवडीवरून वाद; ट्रस्टने थेट पुरावेच दिले, सोबतच केले हे आवाहन

अयोध्या राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस स्वामी गोविंददेव गिरी यांनी निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची CEOपदी झालेली नियुक्ती आणि मुलाखत प्रक्रियेवर एक विशेष प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.

Ram Mandir CEO पदी निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा निवडीवरून वाद; ट्रस्टने थेट पुरावेच दिले, सोबतच केले हे आवाहन

Ram Mandir CEO Jitendra Mishra Controversy: अयोध्या राम मंदिर ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची झालेली नियुक्ती आणि त्यासंबंधीच्या मुलाखत प्रक्रियेवर काही प्रसारमाध्यमांतून उपस्थित केलेल्या प्रश्नांचे श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने अधिकृतपणे खंडन केले आहे. ट्रस्टचे सरचिटणीस स्वामी गोविंददेव गिरी यांनी एक विशेष प्रसिद्धीपत्रक जारी करत पसरणाऱ्या सर्व अफवा तथ्यहीन असल्याचे स्पष्ट केले. संस्थेचे सुशासन आणि पारदर्शकता जपण्यासाठी संपूर्ण निवड प्रक्रिया अत्यंत काटेकोरपणे पार पाडण्यात आली असून त्याचे प्रत्येक टप्प्यावरील दस्तऐवजीकरण सुरक्षित असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

AI आणि तज्ज्ञांच्या मदतीने 5 हजार 585 अर्जांमधून 16 उमेदवारांची छाननी
सीईओ पदासाठी राबवण्यात आलेल्या या व्यापक निवड प्रक्रियेची सुरुवात 6 जुलै 2026 रोजी एका विशेष शोध समितीच्या स्थापनेने झाली होती. या पदासाठी देशभरातून तब्बल 5585 अर्ज प्राप्त झाले होते. दिल्ली एनसीआर, पुणे आणि संबलपूर या 3 प्रमुख केंद्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान आणि विषय तज्ज्ञांच्या साह्याने बहुस्तरीय मूल्यमापन करण्यात आले. या कडक छाननीनंतर केवळ 16 उमेदवारांना अंतिम टप्प्यातील मुलाखतीसाठी निवडण्यात आले होते. 11 ऑगस्ट आणि 12 ऑगस्ट 2026 रोजी अयोध्येत या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या.

हेही वाचा – CM Joseph Vijay Ganesha Idol: मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या वेशभूषेतील गणेश मूर्ती उभारल्याने वाद; भाजप आक्रमक, आयोजकांवर कडक कायदेशीर कारवाईची मागणी

एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांच्या मुलाखतीबाबतचे दावे फेटाळले
नवनिर्वाचित सीईओ एअर मार्शल जितेंद्र मिश्रा (निवृत्त) यांनी मुलाखत प्रक्रियेत सहभागच घेतला नव्हता, हा प्रसारमाध्यमांमधील दावा ट्रस्टने पूर्णपणे चुकीचा ठरवला आहे. मिश्रा यांनी 11 ऑगस्ट 2026 रोजीच्या पहिल्याच सत्रात प्रत्यक्ष मुलाखत दिली होती, असे ट्रस्टने नमूद केले. शोध समितीने 1 सप्टेंबर 2026 रोजी आपला अहवाल सादर केला, ज्यामध्ये मिश्रा यांच्यासह संजय प्रतापसिंह विश्वास राव आणि श्रुती भारद्वाज या तिघांच्या नावांची अंतिम शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर 2 सप्टेंबर 2026 रोजी एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली.

पारदर्शक प्रक्रियेवर ट्रस्टचा शिक्कामोर्तब; अधिकृत माहितीवर विश्वास ठेवण्याचे आवाहन
अंतिम 3 गुणवंत उमेदवारांच्या यादीत नाव समाविष्ट असणे आणि निवड होणे हाच जितेंद्र मिश्रा यांच्या प्रक्रियेतील सक्रिय सहभागाचा आणि गुणवत्तेचा स्पष्ट पुरावा असल्याचे स्वामी गोविंददेव गिरी यांनी अधोरेखित केले. राम मंदिर ट्रस्टने यापुढेही सर्व प्रशासकीय निर्णयांबाबत अशीच पारदर्शकता राखली जाईल, अशी ग्वाही दिली आहे. नागरिकांनी आणि प्रसारमाध्यमांनी कोणत्याही अनधिकृत चर्चांवर विश्वास न ठेवता ट्रस्टने जारी केलेल्या अधिकृत माहितीलाच प्रामाणिक मानावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा – Lalbaugcha Raja 2026: लालबागच्या राजाला डॉलरच्या नोटांचा हार! भक्ताचा अनोखा नजराणा चर्चेत

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number