अमेरिकेतलं वर्ककल्चर चांगलं हा गोड गैरसमज? भारतात परतलेल्या तरुणीनं सांगितला अनुभव, व्हिडीओ व्हायरल

परदेशातील वर्क लाईफ ही सगळ्यांनाच हवीहवीशी वाटते, परंतु याविषयी असणारा समज खोडून काढत भारतीय महिलेने आपला अमेरिकेत काम करण्याचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अमेरिकेतलं वर्ककल्चर चांगलं हा गोड गैरसमज? भारतात परतलेल्या तरुणीनं सांगितला अनुभव, व्हिडीओ व्हायरल

 

परदेशातील वर्क लाईफ ही सगळ्यांनाच हवीहवीशी वाटते,  परंतु याविषयी असणारा समज खोडून काढत भारतीय महिलेने आपला अमेरिकेत काम करण्याचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. अमेरिकेत काम केलं की संध्याकाळी 5 वाजता ऑफिसचं काम संपतं आणि त्यानंतर वैयक्तिक आयुष्यासाठी वेळ मिळतो, असा एक सर्वसाधारण समज आहे. मात्र तेथे जवळपास 10 वर्षे कन्सल्टंट म्हणून काम केल्यानंतर परिनया या नुकत्याच भारतात परतल्या आहेत. 

 त्यांनी भारत आणि अमेरिकेतील वर्क कल्चरमधील फरक, कामाचा ताण आणि स्वतःचे अनुभव सोशल मीडियावर शेअर करत अमेरिकेत कामाची वेळ संपल्यानंतरही ऑफिसचे मेसेज आणि ई-मेल्स तपासून त्यांना उत्तर द्यावं लागत असल्याचं सांगितलं. त्यामुळे अमेरिकेत 5 वाजता ऑफिसचं काम संपतं आणि त्यानंतर काही काम नसतं, असं नाही, असं त्या म्हणतात. आपल्या अनुभवाबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की, अनेकदा संध्याकाळी सातच्या सुमारास त्यांच्या मॅनेजरचा मेसेज यायचा. ई-मेलला अजून उत्तर का दिलं नाही, असं मॅनेजर त्यांना विचारायचे. हे क्वचितच घडायचं असं नाही, तर कामाचा एक नेहमीचा भागच झालं होतं, असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा – Bittu Tabahi Biaora: ‘बिट्टू तबाही’ची अजनार नदीसाठी एकाकी लढाई; मुख्यमंत्र्यांकडून कौतुक, नेदरलँडसमधून नोकरीची ऑफर

परिनया यांच्या मते हा प्रश्न फक्त एका देशापुरता मर्यादित नाही. कंपनी किंवा नोकरी बदलली तरी काम करण्याची पद्धत बदलू शकते, पण ऑफिस सुटल्यानंतरही सतत ऑनलाईन राहून काम करण्याची अपेक्षा जवळपास सगळीकडेच दिसते आणि त्यामुळे येणारा ताण हा जागतिक प्रश्न आहे.

“मानसिक शांततेला सर्वाधिक महत्त्व”
आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये परिनया यांनी मानसिक शांततेला आणि समाधानाला सर्वात जास्त महत्त्व असल्याचं सांगितलं आहे. अमेरिकेत सॉफ्टवेअर कन्सल्टंट म्हणून काम करताना आलेला हा त्यांचा वैयक्तिक अनुभव आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

परिनया यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. भारत आणि अमेरिकेतील कामाची पद्धत, कामाचे तास आणि वर्क-लाईफ बॅलन्स यावर लोक चर्चा करत आहेत. त्या पोस्टवर अनेकजण कंमेंट्समध्ये परदेशातील आपल्या कामाचा अनुभव शेअर करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number