IndiGo Flight : हवेतच इंडिगोच्या विमानाचं इंजिन बंद; चेन्नई विमानतळावर इमर्जन्सीची स्थिती; 224 प्रवासी…

लँडिंगच्या अवघ्या काही मिनिटे आधी विमानाचे डावे इंजिन अचानक बंद पडल्याचे वैमानिकाच्या निदर्शनास आले. या गंभीर प्रसंगी वैमानिकाने तत्परता दाखवत एअर ट्रॅफिक कंट्रोलला (ATC) तात्काळ माहिती दिली.

IndiGo Flight : हवेतच इंडिगोच्या विमानाचं इंजिन बंद; चेन्नई विमानतळावर इमर्जन्सीची स्थिती; 224 प्रवासी…

IndiGo Flight :  कोलकाताहून चेन्नईच्या दिशेने उड्डाण घेतलेल्या इंडिगोच्या ‘6E-723’ या प्रवासी विमानात हवेत असतानाच एक मोठी तांत्रिक समस्या निर्माण झाली. लँडिंगच्या अवघ्या काही मिनिटे आधी विमानाचे डावे इंजिन अचानक बंद पडल्याचे वैमानिकाच्या निदर्शनास आले. या गंभीर प्रसंगी वैमानिकाने तत्परता दाखवत एअर ट्रॅफिक कंट्रोलला (ATC) तात्काळ माहिती दिली, ज्यानंतर चेन्नई विमानतळावर तातडीने ‘फुल इमर्जन्सी’ घोषित करण्यात आली. विमानात चालक दलासह तब्बल 224 प्रवासी प्रवास करत होते, ज्यामुळे काही काळ तीव्र घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

अग्निशामक व वैद्यकीय यंत्रणा सज्ज 

आणीबाणीची माहिती मिळताच विमानतळ प्रशासनाने धावपट्टी क्रमांक 25 तातडीने सुरक्षित केली. खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशामक दलाच्या गाड्या, रुग्णवाहिका आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक धावपट्टीजवळ तैनात करण्यात आले. सुदैवाने, वैमानिकाच्या कौशल्यामुळे आणि योग्य नियोजनामुळे हे विमान रात्री 11:37 वाजता सुरक्षितपणे जमिनीवर उतरले. सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडल्यानंतर रात्री 11:47 च्या सुमारास ही आणीबाणी मागे घेण्यात आली आणि विमानतळावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली.

हेही वाचा – Wrong Medical Treatment: पायाचं दुखणं अन् केली हृदयाची शस्त्रक्रिया; दवाखान्यात महिलेसोबत भयंकर घडलं; संतापजनक प्रकार उघडकीस

विमानतळावरील फुल इमर्जन्सी म्हणजे नेमके काय?

जेव्हा एखाद्या विमानाला हवेत असताना मोठा धोका निर्माण होतो किंवा ते सुरक्षित लँड होण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते, तेव्हा ‘फुल इमर्जन्सी’ लागू केली जाते. ही प्रशासकीय पातळीवरील सर्वोच्च सतर्कता मानली जाते. यादरम्यान पुढील प्रमुख उपाययोजना केल्या जातात:

धावपट्टी आरक्षित करणे 
संबंधित धावपट्टीवरील इतर सर्व उड्डाणे आणि लँडिंग तातडीने रोखले जातात.

आपत्कालीन यंत्रणांची तैनाती
आग लागण्याची शक्यता लक्षात घेऊन फोम व पाण्याच्या गाड्या आणि रुग्णवाहिका धावपट्टीच्या दोन्ही बाजूंना तैनात असतात.

रुग्णालये अलर्टवर 
केवळ विमानतळच नाही, तर परिसरातील प्रमुख रुग्णालये आणि स्थानिक पोलिसांनाही हाय अलर्टवर ठेवले जाते.

कोणत्या परिस्थितीत घोषित केली जाते ही आणीबाणी?

विमानाचे इंजिन अचानक बंद पडणे, लँडिंग गिअर (चाके) न उघडणे, हायड्रॉलिक सिस्टीम फेल होणे किंवा कॉकपिट/कार्गो विभागात आग लागणे अशा मानवी जीवितास धोका निर्माण करणाऱ्या प्रसंगी ही यंत्रणा कार्यन्वित केली जाते. यापूर्वीही अशाच प्रकारच्या तांत्रिक बिघाडामुळे इंडिगोच्या एका आंतरराष्ट्रीय विमानाला राजकोट येथे आपत्कालीन लँडिंग करावे लागले होते. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number