IAS Divya Mittal: आयएएस अधिकारी दिव्या मित्तल यांचा अचानक राजीनामा; 13 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर स्वेच्छानिवृत्ती, कारण..

दिव्या मित्तल यांचा प्रशासकीय सेवेतील प्रवेश अत्यंत प्रेरणादायी राहिलेला आहे. त्यांनी अचानकपणे राजीनामा दिल्यामुळे मोठी चर्चा सुरू झाली आहे.

IAS Divya Mittal: आयएएस अधिकारी दिव्या मित्तल यांचा अचानक राजीनामा; 13 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर स्वेच्छानिवृत्ती, कारण..

IAS Divya Mittal Resignation: उत्तर प्रदेश कॅडरच्या लोकप्रिय आणि कर्तबगार आयएएस अधिकारी दिव्या मित्तल यांनी आपल्या प्रशासकीय सेवेचा अचानक राजीनामा दिला आहे. सुमारे 13 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा निर्णय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर जाहीर केला. पद सुटले असले तरी देशासाठी काम करण्याचे स्वप्न आणि जनतेचे आशीर्वाद कायम सोबत राहतील, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

शिक्षणाचा प्रवास आणि परदेशातील नोकरीचा त्याग
दिव्या मित्तल यांचा प्रशासकीय सेवेतील प्रवेश अत्यंत प्रेरणादायी राहिलेला आहे. त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रवासातील महत्त्वाचे टप्पे जाणून घेऊ..

– त्यांनी देशातील सर्वोच्च संस्था मानल्या जाणाऱ्या IIT दिल्ली आणि IIM बंगळुरू येथून आपले उच्च शिक्षण पूर्ण केले.
– शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना लंडनमध्ये मोठ्या पगाराची आणि आलिशान नोकरी मिळाली होती.
– परदेशात सर्व सुखसोयी उपलब्ध असूनही आपल्या देशासाठी काहीतरी करण्याची तीव्र इच्छा त्यांना अस्वस्थ करत होती.
– अखेर त्यांनी लंडनची नोकरी सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला आणि नागरी सेवा परीक्षेत यश मिळवून त्या IAS अधिकारी बनल्या.

हेही वाचा – Mann Ki Baat: ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचे तरुणांना आवाहन; म्हणाले, ‘ड्रग फ्री इंडिया मोहिमेत…’

प्रशासकीय सेवेतील अनुभव आणि जनसेवा
आपल्या 13 वर्षांच्या कार्यकाळात दिव्या मित्तल यांनी देवरिया, मिर्झापूर आणि संत कबीर नगर यांसारख्या जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी म्हणून उल्लेखनीय काम केले. प्रत्येक सरकारी फाईलमागे एक जिवंत व्यक्ती आणि तिचे प्रश्न असतात, या भावनेने त्यांनी नेहमी गरजू, शेतकरी आणि दिव्यांगांच्या कल्याणासाठी पुढाकार घेतला. मिर्झापूरच्या एका दुर्गम डोंगराळ गावात पहिल्यांदाच नळाचे पाणी पोहोचवल्यानंतर एका वृद्ध महिलेने कौतुकाने त्यांच्या डोक्यावरून फिरवलेला थरथरता हात हा आपल्या आयुष्यातील सर्वात मोलाचा स्पर्श होता, अशी आठवण त्यांनी या वेळी आवर्जून सांगितली.

जनतेचे प्रेम आणि सहकाऱ्यांचे मानले आभार
सुरुवातीला आपण लोकांसाठी काहीतरी बदल घडवायला आलो आहोत असे वाटत होते. म्हणजे लोकांना काही देण्यासाठी आलो आहोत, असे त्यांना वाटत होते. परंतु प्रत्यक्षात जनतेने आपल्याला अपार प्रेम आणि सन्मान दिला. यामुळे काही देण्यापेक्षा आपणच बरंच काही घेऊन निघालो आहोत, अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली. प्रशासकीय प्रवासात मोलाची साथ देणाऱ्या सर्व सहकारी अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले. पद सोडले तरीही लोकसेवेचा ध्यास आणि मिर्झापूरच्या आजींसारख्या हजारो नागरिकांचे आशीर्वाद आयुष्यभर ऊर्जा देत राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा – Kashmiri Pandit: काश्मिरी पंडितांचे दु:ख हा विनोदाचा विषय नाही; जे अँड के पीस फोरमचा समय रैना आणि शॅरॉन वर्मावर निशाणा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number