Operation Sindoor Rafale X Guard Decoy: 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान (Operation Sindoor) भारतीय हवाई दलाचे (IAF) राफेल जेट्स पाडल्याची ओरड करत पाकिस्तानने मोठा जल्लोष साजरा केला होता. मात्र, आंतरराष्ट्रीय लष्करी तज्ज्ञ आणि संरक्षण अहवालांनुसार पाकिस्तानचा हा दावा पूर्णपणे फोल ठरला आहे. भारतीय हवाई दलाच्या राफेल जेट्सने उड्डाण करताना 'एक्स-गार्ड' (X-Guard) नावाची अत्यंत प्रगत 'टोअड डिकॉय सिस्टिम' (Towed Decoy System) सक्रिय केली होती. ही इस्रायली तंत्रज्ञानावर आधारित फायबर ऑप्टिक सिस्टिम राफेलच्या 'स्पेक्ट्रा' (SPECTRA) इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सूटचा मुख्य भाग आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेने (AI) शत्रूच्या रडारची केली दिशाभूल
सुमारे 30 किलोग्रॅम वजनाची ही एक्स-गार्ड डिकॉय सिस्टिम राफेल विमानाच्या मागे फायबर-ऑप्टिक केबलद्वारे 99 ते 100 मीटर अंतरावर खेचली जाते. ही सिस्टिम 500 वॉटचे 360-डिग्री जॅमिंग सिग्नल सोडते आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) मदतीने राफेल विमानाची हुबेहूब सिग्नेचर अन् रडार लहरी तयार करते. त्यामुळे शत्रूच्या रडार आणि क्षेपणास्त्रांना तेच खरे लढाऊ विमान असल्याचा भास होतो. जेव्हा शत्रूचे रडार टार्गेट लॉक करते, तेव्हा ते खऱ्या राफेलऐवजी या डिकॉय सिस्टिमला लॉक करते.
पाकड्यांचे एअर डिफेंस कन्फ्यूज; चिनी बनावटीची पीएल-15E क्षेपणास्त्रे डमी टार्गेटवर आदळली
पाकिस्तानच्या जे-10सी (J-10C) लढाऊ विमानातील चिनी बनावटीच्या 'केएलजे-7ए' (KLJ-7A) एईएसए (AESA) रडारने आणि 'पीएल-15E' (PL-15E) क्षेपणास्त्रांनी या डिकॉय सिस्टिमलाच खरे राफेल मानण्याची मोठी चूक केली. पाक लष्कराने सोडलेली महागडी क्षेपणास्त्रे खऱ्या विमानावर आदळण्याऐवजी मागे असलेल्या डमी टार्गेटवर जाऊन धडकली आणि हवेतच नष्ट झाली. भारतीय हवाई दलाचे खरे राफेल जेट्स मात्र दुसरीकडे सुरक्षित उड्डाण करत आपले मिशन यशस्वीपणे पार पाडत होते.
तंत्रज्ञानाच्या जोरावर भारताची बाजी; जागतिक पातळीवर हवाई रणनीतीचे कौतुक
पाकिस्तानने नष्ट झालेल्या याच डिकॉय उपकरणांचे तुकडे आणि इंधनाच्या टाक्या (Drop Tanks) पाहून भारतीय विमाने पाडल्याचा चुकीचा समज करून घेतला व प्रसारमाध्यमांत दावे केले. अमेरिकेचे माजी लढाऊ वैमानिक रायन बोडेनहायमर यांच्यासह अनेक जागतिक तज्ज्ञांनी भारतीय हवाई दलाच्या या इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर रणनीतीला 'अत्यंत कल्पक' आणि 'स्मार्ट' पाऊल म्हटले आहे. आधुनिक हवाई युद्धात केवळ क्षेपणास्त्रेच नाही, तर योग्य वेळी केलेली दिशाभूल ही किती महत्त्वाची ठरते, हेच भारताने या मोहिमेतून दाखवून दिले आहे.
हेही वाचा – New SIM Card Rules: बनावट सिम कार्ड अन् ऑनलाईन फ्रॉडला ब्रेक! सिम खरेदीसाठी आता बायोमेट्रिक e-KYC अनिवार्य