AIIMS Recruitment : डॉक्टरांसाठी सुवर्णसंधी! AIIMS मध्ये 121 पदांसाठी भरती जाहीर; दरमहा मिळणारा ‘इतका’ पगार

एकूण 121 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात असून, हे पद तीन वर्षांच्या कालावधीसाठी असणार आहे.

AIIMS Recruitment : डॉक्टरांसाठी सुवर्णसंधी! AIIMS मध्ये 121 पदांसाठी भरती जाहीर; दरमहा मिळणारा ‘इतका’ पगार

AIIMS Raipur Recruitment : वैद्यकीय क्षेत्रात सरकारी नोकरी शोधणाऱ्या डॉक्टरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. 'ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस' (AIIMS), रायपूरने विविध विभागांमधील 'सीनियर रेसिडेंट' (नॉन-ॲकॅडेमिक) या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. एकूण 121 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात असून, हे पद तीन वर्षांच्या कालावधीसाठी असणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना 16 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

जागांचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता

जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, 'ग्रुप-ए' अंतर्गत 121 पदांची विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये सामान्य प्रवर्गासाठी 44, ओबीसीसाठी 37, एससीसाठी 20, एसटीसाठी 13 आणि ईडब्ल्यूएससाठी 7 जागा राखीव आहेत. ॲनेस्थेशिओलॉजी, जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी, ट्रॉमा अँड इमर्जन्सी (10 जागा), बालरोगशास्त्र, ऑर्थोपेडिक्स यांसारख्या अनेक महत्त्वाच्या शाखांमध्ये या भरत्या केल्या जात आहेत. अर्जदारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची MD, MS, DNB किंवा तत्सम पदव्युत्तर पदवी असणे अनिवार्य आहे. दंतचिकित्सा विभागासाठी MDS पदवी आवश्यक राहील.

वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि वेतन

या भरतीसाठी उमेदवारांचे कमाल वय 45 वर्षे निश्चित करण्यात आले असून राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सूट मिळेल. अर्जांची छाननी, शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाच्या आधारे उमेदवारांचे शॉर्टलिस्टिंग केले जाईल; तसेच आवश्यकतेनुसार परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे अंतिम निवड होईल. निवड झालेल्या उमेदवारांना 7 व्या वेतन आयोगाच्या 'पे मॅट्रिक्स लेव्हल-11' नुसार दरमहा 67,700 मूळ वेतन आणि इतर शासकीय भत्ते मिळतील.

हेही वाचा – Working Parents Daycare Facility: वर्किंग पॅरेंट्ससाठी गुड न्यूज! नवीन कामगार नियमांमुळे मुलांच्या संगोपनाची चिंता कमी, आता कंपनीमध्ये…

अर्ज प्रक्रिया आणि शुल्क

या भरतीसाठी 6 ऑगस्टपासून 'गुगल फॉर्म'द्वारे अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अंतिम मुदत 16 ऑगस्ट आहे. सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 1,000 ठेवण्यात आले आहे. महिला, एससी, एसटी, दिव्यांग आणि माजी सैनिकांना शुल्कातून पूर्ण सूट देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करण्याचे आवाहन एम्स रायपूर प्रशासनाने केले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number