Gold Rate Today: सोन्याने गाठला 2 महिन्यांतील उच्चांक; चांदी 2,600 रुपयांनी महागली, पाहा प्रमुख शहरांतील आजचे दर

आज 20 ऑगस्ट 2026 रोजी सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅममागे 350 रुपयांची वाढ झाली असून, चांदीच्या भावात थेट 2640 रुपयांची मोठी वाढ नोंदवली गेली आहे.

Gold Rate Today: सोन्याने गाठला 2 महिन्यांतील उच्चांक; चांदी 2,600 रुपयांनी महागली, पाहा प्रमुख शहरांतील आजचे दर

Gold-Silver Rates Today: सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सराफा बाजारात मौल्यवान धातूंच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी तेजी पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारातील घडामोडी आणि स्थानिक पातळीवर वाढलेली मागणी यामुळे सोन्या-चांदीच्या भावाने गेल्या दोन महिन्यांतील उच्चांक गाठला आहे. आज 20 ऑगस्ट 2026 रोजी सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅममागे 350 रुपयांची वाढ झाली असून, चांदीच्या भावात थेट 2640 रुपयांची मोठी वाढ नोंदवली गेली आहे.

मुंबई-पुण्याच्या बाजारात सोन्याचा धुमाकूळ 
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. मुंबईच्या सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 1,58,439 रुपयांवर पोहोचला असून त्यात कालच्या तुलनेत 330 रुपयांची वाढ झाली आहे. तसेच ग्रोच्या आकडेवारीनुसार, पुणे शहरात 24 कॅरेट शुद्ध 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,58,330 रुपयांवर गेला आहे. मुंबईत 8 ग्रॅम 22 कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना 1,45,228 रुपये मोजावे लागत आहेत.

24 कॅरेट, 22 कॅरेट सोने आणि 1 किलो चांदीचे आजचे ताजे बाजारभाव  
आजच्या ताज्या बुलियन दरानुसार देशातील सराफा बाजारात मौल्यवान धातूंचे दर खालीलप्रमाणे नोंदवले गेले आहेत:
24 कॅरेट सोने (10 ग्रॅम): 1,58,740 रुपये  
22 कॅरेट सोने (10 ग्रॅम): 1,45,515 रुपये  
चांदी (1 किलो): 2,40,480 रुपये

हेही वाचा – Sugar Price Hike: गृहिणींचं बजेट बिघडणार; सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या दरात 18 दिवसांत तब्बल 18 रुपयांची वाढ

देशातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे ताजे दर; प्रति 10 ग्रॅमचे दर 1.58 लाखांच्या पार
देशभरातील इतर प्रमुख महानगरांमध्येही सोन्याच्या दरात जोरदार तेजी दिसून येत आहे:
दिल्ली: 24 कॅरेटसाठी 1,58,160 रुपये मोजावे लागत आहेत. तर,  22 कॅरेटचा दर 1,44,980 रुपये आहे.
मुंबई: 24 कॅरेटसाठी 1,58,430 रुपये मोजावे लागत आहेत. तर, 22 कॅरेटचा दर 1,45,228 रुपये आहे.
बंगळुरू: 24 कॅरेटसाठी 1,58,560 रुपये मोजावे लागत आहेत. तर, 22 कॅरेटचा दर 1,45,347 रुपये आहे.
कोलकाता: 24 कॅरेटसाठी 1,58,080 रुपये मोजावे लागत आहेत. तर, 22 कॅरेटचा दर 1,44,907 रुपये आहे.
हैदराबाद: 24 कॅरेटसाठी 1,58,540 रुपये मोजावे लागत आहेत. तर, 22 कॅरेटचा दर 1,45,328 रुपये आहे.

दरवाढीची प्रमुख कारणे आणि ग्राहकांवर होणारा थेट परिणाम
आंतरराष्ट्रीय बाजारातील आर्थिक चढ-उतार, मध्यवर्ती बँकांकडून मोठ्या प्रमाणावर केली जाणारी सोन्याची खरेदी आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात होणारे बदल यामुळे भारतीय बाजारात ही तेजी आली आहे. बंगळुरूमध्ये आज सर्वाधिक दरवाढ झाली असून तिथे 24 कॅरेट 8 ग्रॅम सोन्याचा दर तब्बल 3400 रुपयांनी वाढला आहे. सणासुदीच्या व लग्नसराईच्या तोंडावर झालेल्या या दरवाढीमुळे सामान्य खरेदीदारांचे बजेट कोलमडले असले, तरी सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही स्थिती अत्यंत फायदेशीर ठरत आहे.

हेही वाचा – SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! रोख पैसे काढण्याच्या नियमांत बदल; इतक्या व्यवहारांनंतर अतिरिक्त शुल्क

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number