ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या माहितीनुसार, 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव 2,150 रुपयांनी घसरून 1,58,100 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. याआधीच्या व्यवहाराच्या सत्रात सोन्याचा दर 1,60,250 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. म्हणजेच सोन्याच्या किमतीत घट नोंदवण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी उलथापालथ झाल्यामुळे त्याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर झाला आहे. यात डॉलर वाढणे, अमेरिकेतील व्याजदर व शेअर बाजार यांमध्ये तेजी अशा गोष्टी कारणीभूत ठरतात. त्यामुळे जागतिक बाजारात सोन्याच्या दरात होणाऱ्या हालचालींचा थेट परिणाम भारतीय सराफा बाजारावरही दिसून आला आहे. दिल्लीच्या बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. मात्र, चांदीने याउलट कामगिरी करत तेजी नोंदवली आहे.
सोनं स्वस्त आणि चांदी महाग का झाली?
सोनं आणि चांदी दोन्ही मौल्यवान धातू असले तरी त्यांचे मार्केट वेगळं असतं. सोनं पडत असताना चांदी वाढण्याची 3 मुख्य कारणं आहेत:
1. औद्योगिक मागणी:
सोनं फक्त दागिने आणि गुंतवणुकीसाठी वापरलं जातं, पण चांदीचा वापर मोठ्या प्रमाणात उद्योगांमध्ये होतो – जसं की सोलर पॅनेल, इलेक्ट्रिक वाहने (EV), मोबाईल-चिप्स. जेव्हा या उद्योगांची मागणी वाढते, तेव्हा सोने पडले तरी चांदीचे भाव वाढतात.
2. Gold-Silver Ratio:
गुंतवणूकदार जेव्हा सोनं खूप महाग झालंय असं पाहतात, तेव्हा ते नफा काढून स्वस्त असलेल्या चांदीत पैसे लावतात. याला 'फंड रोटेशन' म्हणतात. त्यामुळे सोन्यात घसरण आणि चांदीत तेजी एकाच वेळी दिसते.
3. कमी किंमत = जास्त खरेदी:
सोन्याच्या तुलनेत चांदी खूप स्वस्त आहे. त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदार आणि चांदीच्या दागिन्यांची मागणी वाढल्यावरही चांदी तेजीत राहते.
आजचे मुंबई-पुण्यामधील सोन्याचे ताजे दर
24 कॅरेट सोन्याचा भाव
1 ग्रॅम – 15,431
8 ग्रॅम – 1,23,448
10 ग्रॅम – 1,54,310
22 कॅरेट सोन्याचा भाव
1 ग्रॅम -14,445
8 ग्रॅम – 1,13,160
10 ग्रॅम – 1,41,450
18 कॅरेट सोन्याचा भाव
1 ग्रॅम – 11,573
8 ग्रॅम – 92,584
10 ग्रॅम – 1,15,730
टीप: मात्र प्रत्यक्ष खरेदीच्या वेळी शहर, ज्वेलर, मेकिंग चार्जेस आणि इतर शुल्कांनुसार सोन्याची अंतिम किंमत वेगळी असू शकते.