Gold – Silver Rate : ग्राहकांसाठी खूशखबर ! सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या 24, 22 कॅरेट सोने आणि चांदीचे आजचे दर

सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात घसरण नोंदवण्यात आली, ज्यामुळे खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Gold – Silver Rate : ग्राहकांसाठी खूशखबर ! सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या 24, 22 कॅरेट सोने आणि चांदीचे आजचे दर

Gold Rates Today: सणासुदीच्या दिवसांत सोने-चांदीची खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या सोने-चांदीच्या किमतींमध्ये 5 सप्टेंबर 2026 रोजी, शनिवारी काही प्रमाणात फेरबदल पाहायला मिळाला. सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात घसरण नोंदवण्यात आली, ज्यामुळे खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. स्थानिक कर, उत्पादन शुल्क आणि मेकिंग शुल्कामुळे देशभरातील विविध शहरांमध्ये सोन्याच्या अंतिम दरात थोडा फरक दिसून येतो.

5 सप्टेंबरचे 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
भारतीय सराफा बाजारातील ताज्या आकडेवारीनुसार, आज 5 सप्टेंबर रोजी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1,53,040 रुपये इतका नोंदवला गेला आहे. तर दुसरीकडे, दागिन्यांसाठी प्रामुख्याने वापरल्या जाणाऱ्या 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,40,287 रुपयांवर आला आहे. याच वेळी चांदीच्या दरात मात्र तेजी कायम असून, आज 1 किलो चांदीचा दर 2,36,700 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. हे सर्व दर सूचक असून यामध्ये जीएसटी (GST) आणि इतर स्थानिक करांचा समावेश नाही. तसेच, आज मुंबई, नागपूर, पुणे कोल्हापूर, जळगाव तसेच इतर शहरांतील भाव मुंबई, नागपूर, पुणे कोल्हापूर, जळगाव तसेच इतर शहरांतील भाव  जवळजवळ सारखे आहे.

हेही वाचा – PAN Card Fraud Check: तुमच्या पॅन कार्डवर नकळत कर्ज उचलतायत सायबर भामटे! वेळीच सावध व्हा, घरबसल्या 2 मिनिटांत 'असे' तपासा

24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्यामधील मुख्य फरक
सोने खरेदी करताना 24 कॅरेट आणि 22 कॅरेटमधील फरक जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. 24 कॅरेट सोने हे 99.9 टक्के शुद्ध मानले जाते; मात्र ते अत्यंत मऊ असल्याने त्याचे थेट दागिने तयार करता येत नाहीत. दुसरीकडे, 22 कॅरेट सोन्यामध्ये सुमारे 91 टक्के शुद्ध सोने असते आणि उर्वरित 9 टक्के भागात तांबे, चांदी किंवा जस्त यांसारख्या धातूंचे मिश्रण केले जाते. या मिश्रणामुळे धातूला टणकपणा येतो, म्हणूनच बहुतांश सराफ 22 कॅरेट सोन्याचेच दागिने तयार करून विकतात.

ग्राहकांसाठी खरेदीची योग्य वेळ अन् नियोजन
गेल्या वर्षापासून मौल्यवान धातूंच्या किंमतीत सातत्याने प्रचंड वाढ होत असल्याने सर्वसामान्यांना सोन्याचे दागिने खरेदी करण्यापूर्वी बजेटचा विचार करावा लागत आहे. सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होण्याचा ट्रेंड सुरूच असला, तरी जन्माष्टमीच्या मुहूर्तावर दरात झालेली ही घसरण खरेदीदारांसाठी संधी ठरू शकते. त्यामुळे ग्राहकांनी खरेदीला जाण्यापूर्वी आपल्या स्थानिक ज्वेलर्सकडून जीएसटी आणि मेकिंग चार्जेससह अचूक दराची खात्री करून घेणे सोयीचे ठरेल.

हेही वाचा – Driving Licence New Rules : आता केवळ दंड भरून सुटका नाही; 'या' एका चुकीमुळे ड्रायव्हिंग लायसन्स थेट होणार रद्द! नितीन गडकरींनी सांगितलं..

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number