Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदी स्वस्त; पाहा आजचे लेटेस्ट दर

दरातील घसरणीमुळे चालू आठवड्यातील संपूर्ण तेजी संपुष्टात आली असून आजच्या सत्रातही गुंतवणूकदारांची नफावसुली कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदी स्वस्त; पाहा आजचे लेटेस्ट दर

Gold Silver Price Today Update: बुलियन मार्केटमध्ये नफावसुलीच्या तीव्र लाटेमुळे किमतींवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX वर आज शुक्रवारी चांदी 2,426 रुपयांनी घसरून व्यवहार करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातसुद्धा दोन्ही धातूंचे भाव मंदीच्या छायेत आहेत. गुरुवारी सोन्याचे भाव 1.3 टक्क्यांनी घटून बंद झाले होते, तर व्यवहारादरम्यान धातू 5 जूननंतरच्या उच्चांकावर पोहोचला होता. मात्र, त्यानंतर आलेल्या या घसरणीमुळे चालू आठवड्यातील संपूर्ण तेजी धुळीस मिळाली असून आजच्या सत्रातही गुंतवणूकदारांची नफावसुली कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

वायदा बाजारात म्हणजेच MCX वर सोन्याचा भाव 1,184 रुपयांच्या घसरणीसह 1,52,282 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. याच वेळी चांदीच्या दरातही मोठी घसरण नोंदवली गेली असून ती 2,33,021 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेंड करत आहे. जागतिक स्तरावर सोन्याच्या दरात 0.92 टक्क्यांची नरमाई दिसून आली असून तो 4,379 डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे. सोबतच चांदीचे जागतिक दर 1.34 टक्क्यांनी घटून 64.125 डॉलर प्रति औंसवर स्थिरावले आहेत.

प्रमुख शहरांमधील दर –

देशभरातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे: 

– मुंबई आणि पुणे शहरात 24 कॅरेट सोन्याचा दर 15,289 रुपये प्रति ग्रॅम आणि 22 कॅरेटचा दर 14,015 रुपये प्रति ग्रॅमवर नोंदवला गेला आहे. 
– दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 14,030 रुपये प्रति ग्रॅम आहे, त्यानुसार 10 ग्रॅमची मूळ किंमत 1,40,300 रुपये होते
– दिल्लीतील या मूळ किमतीवर 12 टक्के मेकिंग चार्ज म्हणजे 16,836 रुपये आणि 3 टक्के GST म्हणजेच 4,714 रुपये जोडल्यास 10 ग्रॅम सोन्याचा एकूण खरेदी दर 1,61,850 रुपयांपर्यंत पोहोचतो.
– कानपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 71 रुपयांनी घसरून 15,304 रुपये प्रति ग्रॅम झाला आहे. तसेच 22 कॅरेटचा दर 65 रुपयांनी घसरून 14,030 रुपये, तर 18 कॅरेट सोन्याचा भाव 11,482 रुपये प्रति ग्रॅम झाला आहे. 
– पाटणा शहरामध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 14,020 रुपये प्रति ग्रॅम नोंदवला गेला असून तेथे 10 ग्रॅमसाठी 1,40,200 रुपये मोजावे लागत आहेत.
– सराफा बाजारात दिल्लीसह कानपूर आणि इतर बहुतांश शहरांमध्ये चांदीचा भाव 255 रुपये प्रति ग्रॅम म्हणजेच 2,55,000 रुपये प्रति किलोग्रॅमच्या पातळीवर आहे.

हेही वाचा – Ladki Bahin Yojana Installment: लाडक्या बहिणींसाठी रक्षाबंधनची भेट; 3,19.53 कोटींचा निधी वर्ग; सणापूर्वी खात्यात जमा होणार 3,000 रुपये

घसरणीची प्रमुख कारणे
अमेरिकेतील जुलै महिन्याची महागाईची आकडेवारी नियंत्रणात राहिली असल्याने यूएस फेडरल रिझर्व्हकडून आगामी महिन्यात व्याजदर वाढवले जाण्याची शक्यता फारच कमी झाली आहे. मध्यवर्ती बँकांच्या व्याजदराबाबतच्या निर्णयांचा मौल्यवान धातूंच्या किमतींवर थेट परिणाम होत असतो. याव्यतिरिक्त अमेरिकन डॉलरची हालचाल, आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर आणि जागतिक पातळीवरील जिओ-पॉलिटिकल तणाव यांसारखे घटक धातूंचे भाव निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. 

सध्याच्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर बाजार तज्ज्ञांनी अंतर्गत बाजारात सोन्यासाठी 1,52,000 ते 1,52,500 रुपयांची पातळी ही अत्यंत मजबूत सपोर्ट लेव्हल असल्याचे स्पष्ट केले आहे. सोन्याच्या किमतीत आणखी घसरण झाल्यास या पातळीवर भाव स्थिरावण्याची दाट शक्यता आहे. आगामी काळात जागतिक आर्थिक घडामोडी आणि गुंतवणूकदारांचे कल यावरच सोने-चांदीची पुढील वाटचाल अवलंबून असणार आहे.

हेही वाचा – Auto-Taxi Fare Hike: सामान्यांना आणखी एक झटका! ऑटो-रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ होण्याची शक्यता, आता मोजावे लागतील…

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number