Gold-Silver Price Today: सोने-चांदीच्या दरात पुन्हा तेजी; पाहा तुमच्या शहरांतील ताजे दर

गेल्या काही दिवसांतील दरातील चढ-उतारानंतर आज सोने आणि चांदी या दोन्ही धातूंमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे. दोन दिवसांत चांदीच्या दरात तब्बल 10,100 रुपयांची वाढ झाली.

Gold-Silver Price Today: सोने-चांदीच्या दरात पुन्हा तेजी; पाहा तुमच्या शहरांतील ताजे दर

Gold-Silver Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ नोंदवली जात असतानाही, बाजारातील जोरदार मागणीमुळे आज मौल्यवान धातूंच्या दरात पुन्हा एकदा मोठी तेजी पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांतील दरातील चढ-उतारानंतर आज सोने आणि चांदी या दोन्ही धातूंमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे. दोन दिवसांत चांदीच्या दरात तब्बल 10,100 रुपयांची वाढ झाली असून सोन्याच्या किमतीतही सकारात्मक बदल झाला आहे.

सोन्याच्या दरातील चढ-उतार आणि सध्याची स्थिती

सोन्याच्या किमतीतील घडामोडींचा आढावा घेतल्यास, 9 ऑगस्ट रोजी सोन्याचे दर स्थिर राहिले होते. त्यापूर्वी सलग चार दिवस 24-कॅरेट सोन्यामध्ये 8,350 ची तर 22-कॅरेट सोन्यामध्ये 7,650 ची लक्षणीय वाढ झाली होती. मात्र, या वाढीनंतर बाजारात घसरण पाहायला मिळाली. 10 ऑगस्ट रोजी 10 ग्रॅम 24-कॅरेट सोन्याचा दर 380 ने आणि 22-कॅरेटचा दर 350 ने घसरला होता. सलग दोन दिवसांच्या या घसरणीमध्ये 24-कॅरेट सोन्यामध्ये एकूण 1,860 ची आणि 22-कॅरेट सोन्यामध्ये 1,710 ची घट नोंदवली गेली. आज मात्र या घसरणीला ब्रेक लागला असून, राजधानी दिल्लीत 10ग्रॅम 24 कॅरेट आणि 22-कॅरेट सोन्याच्या दरात प्रत्येकी 10 ची किरकोळ वाढ झाली आहे.

देशातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर
देशातील प्रमुख महानगरांमध्ये सोन्याच्या दरात किरकोळ फरक पाहायला मिळत आहे. 

राजधानी दिल्लीमध्ये 10 ग्रॅम 24-कॅरेट सोन्याचा दर 1,53,980 असून, 22-कॅरेटसाठी 1,41,160 आणि 18-कॅरेटसाठी 1,15,530 मोजावे लागत आहेत. 

आर्थिक राजधानी मुंबई तसेच कोलकात्यात सोन्याचे भाव समान नोंदवले गेले आहेत; जिथे 24-कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,53,830, 22-कॅरेटचा दर 1,41,010 आणि 18-कॅरेट सोन्याचा दर 1,15,380 इतका आहे.  

हेही वाचा – Prakash Raj : SIR दरम्यान ASDDO अंतर्गत माझी मतदार नोंदणी रद्द; प्रकाश राज यांचा व्हिडीओ शेअर करत दावा

तीन दिवसांच्या शांततेनंतर चांदीची पुन्हा मुसंडी
चांदीच्या बाजारात सलग तीन दिवस दर स्थिर राहिल्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ पाहायला मिळाली. या दोन दिवसांच्या कालावधीत प्रति किलो चांदीच्या दरात 10,100 ने वाढ झाली आहे. आज दिल्लीमध्ये प्रति किलो चांदीचा दर 100 ने वाढून 2,55,100 च्या पातळीवर पोहोचला आहे. मुंबई आणि कोलकाता येथेही चांदी याच दराने विकली जात आहे. दुसरीकडे, चेन्नईमध्ये प्रति किलो चांदीचा दर 2,60,100 वर पोहोचला असून, देशातील प्रमुख महानगरांमध्ये चेन्नईमध्ये चांदी सर्वाधिक महाग ठरली आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number