आपली त्वचा छान, तजेलदार दिसावी असं सगळ्यांनाच वाटत असतं. त्यासाठी बऱ्याच वेळा आपण वेगवेगळ्या केमिकलयुक्त क्रीम वापरत असतो.एवढं करूनही बऱ्याच वेळेस आपले कोपर आणि गुडघे काळसर दिसतात. चला तर पाहूया काही घरगुती उपाय- काकडीच्या मदतीने तुम्ही कोपर आणि गुडघ्यांचा काळेपणा दूर होऊ शकतो. यासाठी सर्वप्रथम काकडी गोल आकारात कापून घ्यावी. आता काकडीचे हे काप कोपर […]
आपली त्वचा छान, तजेलदार दिसावी असं सगळ्यांनाच वाटत असतं. त्यासाठी बऱ्याच वेळा आपण वेगवेगळ्या केमिकलयुक्त क्रीम वापरत असतो.एवढं करूनही बऱ्याच वेळेस आपले कोपर आणि गुडघे काळसर दिसतात.
चला तर पाहूया काही घरगुती उपाय-
काकडीच्या मदतीने तुम्ही कोपर आणि गुडघ्यांचा काळेपणा दूर होऊ शकतो. यासाठी सर्वप्रथम काकडी गोल आकारात कापून घ्यावी. आता काकडीचे हे काप कोपर आणि गुडघ्यावर जवळपास १५ मिनिटे चोळावे. त्यानंतर 5 मिनिटे वाळू द्या. मग त्वचा थंड पाण्याने धुवून घ्यावी. यामुळे तुम्हाला काही दिवसांनी फरक जावणेल.
बेकिंग सोडा हा त्वचेसाठी सर्वोत्तम क्लीनझर मानला जातो. यंत्रांमुळे लिंबू आणि बेकिंग सोडा हे त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यास उपयुक्त आहे.त्यामुळे ते वापरल्याने देखील फायदा होतो.
त्वचेचा पोत व रंग सुधारण्यासाठीही हळदी हा उत्तम पर्याय आहे. यासाठी 1 चमचे दूध हळद पावडरमध्ये मिसळून पेस्ट तयार करून घ्या आणि गुडघ्यावर लावा.
मध ही त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करते. यासाठी अर्धा चमचा लिंबाच्या रसात 2 चमचे मध आणि 1 चमचा बेकिंग सोडा मिसळा. आणि त्वचेवर 20-30 मिनिटांसाठी लावून मग त्वचा थंड पाण्याने धुवा.