Isha Koppikar : ‘हो, मी अंधभक्त आहे…’; पंतप्रधान मोदींवरील टीकेनंतर ईशा कोप्पीकर भडकली; ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर

विद्यार्थी आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अनुचित भाषेचा वापर करण्यात आला होता. या घटनेवर बॉलिवूड अभिनेत्री ईशा कोप्पीकर हिने अत्यंत तीव्र शब्दांत आपला संताप व्यक्त केला आहे.

Isha Koppikar : ‘हो, मी अंधभक्त आहे…’; पंतप्रधान मोदींवरील टीकेनंतर ईशा कोप्पीकर भडकली; ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर

Isha Koppikar : NEET परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी आयोजित विद्यार्थी आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मातोश्रींबद्दल अनुचित भाषेचा वापर करण्यात आला होता. या घटनेवर बॉलिवूड अभिनेत्री ईशा कोप्पीकर हिने अत्यंत तीव्र शब्दांत आपला संताप व्यक्त केला आहे. तरुणांच्या या वर्तनाला लोकशाहीसाठी घातक आणि राष्ट्रविरोधी ठरवत तिने आपली रोखठोक भूमिका मांडली. तिच्या या भूमिकेनंतर सोशल मीडियावर तिच्यावर टीकेची झोड उठली असून, अनेक युजर्सनी तिला अनफॉलो करण्यास सुरुवात केली. 

मात्र, या ट्रोलिंगला न घाबरता ईशाने, “मला अनफॉलो केले तरी फरक पडत नाही, देशावर प्रेम करण्यासाठी मला कोणी ‘अंधभक्त’ म्हणत असेल तर त्याचा मला सार्थ अभिमान आहे,” असे स्पष्ट करत ट्रोलर्सचा समाचार घेतला आहे.

मुद्द्यांवर बोला, वैयक्तिक चिखलफेक नको; सेलिब्रिटींच्या मौनावर ओढले ताशेरे

एका मुलाखतीदरम्यान ईशाने स्पष्ट केले की, लोकशाहीत सरकारला प्रश्न विचारण्याचा आणि आपल्या मागण्या मांडण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. परंतु, निषेध नोंदवताना वैयक्तिक पातळीवर येऊन अपशब्द वापरणे पूर्णपणे चुकीचे आहे. केवळ फॉलोअर्स गमावण्याच्या भीतीने किंवा नकारात्मक प्रतिक्रियांना घाबरून महत्त्वाच्या मुद्द्यांवर मौन बाळगणाऱ्या सेलिब्रिटींवरही तिने जोरदार ताशेरे ओढले. आपल्या चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी किंवा सोशल मीडियावरील लोकप्रियतेसाठी विचारांशी तडजोड करणे तिच्या स्वभावात नसल्याचे तिने नमूद केले. 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ईशाने आपल्या राष्ट्रवादी विचारसरणीवर ठाम राहण्याचा निर्धार व्यक्त करत आपले वक्तव्य मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला.

हेही वाचा – Ajay Devgn Host Crime Patrol : छोट्या पडद्यावर अजय देवगणचे पदार्पण; ‘क्राइम पेट्रोल’च्या नव्या सीझनचा प्रोमो आउट

‘तानाशाही’ शब्दाच्या वापरावर आक्षेप 

जंतरमंतर येथील आंदोलनावर भाष्य करताना ईशाने राजकीय चर्चांमध्ये ‘हुकूमशाही’ किंवा ‘तानाशाही’ या शब्दांचा वापर हलक्याफुलक्या पद्धतीने न करण्याचा सल्ला दिला आहे. खरी तानाशाही काय असते, जिथे सरकारविरोधात बोलल्यास कठोर परिणामांना सामोरे जावे लागते, याची आठवण करून देत तिने भारताच्या लोकशाही व्यवस्थेचे समर्थन केले. “अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे बेजबाबदारपणे काहीही बोलण्याचा परवाना नव्हे, तर त्यात नागरिकांच्या जबाबदारीचाही समावेश असतो,” असे सांगत तिने सोशल मीडियावरील निरर्थक वादात न अडकता देशाच्या हिताचे चिंतन करण्याचे आवाहन केले आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number