EPFO PF News : ईपीएफओ पीएफ काढण्याचे नियम झाले सोपे! आणीबाणीच्या परिस्थिती मिळतील 75 टक्के पैसे; जाणून घ्या नवीन अपडेट्स

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या कोट्यवधी सदस्यांना मोठा दिलासा देत भविष्य निर्वाह निधीतून (PF) ॲडव्हान्स पैसे काढण्याच्या नियमांमध्ये महत्त्वाच्या सुधारणा केल्या आहेत.

EPFO PF News : ईपीएफओ पीएफ काढण्याचे नियम झाले सोपे! आणीबाणीच्या परिस्थिती मिळतील 75 टक्के पैसे; जाणून घ्या नवीन अपडेट्स

How Much EPF Can You Withdraw?: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या कोट्यवधी सदस्यांना मोठा दिलासा देत भविष्य निर्वाह निधीतून (PF) ॲडव्हान्स पैसे काढण्याच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय आणीबाणी, लग्नकार्य किंवा गृहखरेदी अशा प्रसंगी सभासदांना स्वतःच्या जमा पुंजीचा वापर करणे अधिक सुलभ व्हावे, हा यामागील मुख्य उद्देश आहे. नव्या रचनेनुसार पैसे काढण्याच्या कारणांची तीन स्पष्ट गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे – 
– आवश्यक गरजा: वैद्यकीय उपचार, आजारपण.
– कौटुंबिक व गृहनिर्माण गरजा: शिक्षण, विवाह आणि घर खरेदी किंवा रिनोव्हेशन.
– विशेष परिस्थिती: अचानक उद्भवलेली आणीबाणी.

वैद्यकीय उपचारांसाठी अमर्याद संधी, तर शिक्षण व विवाहासाठी मर्यादा निश्चित
नवीन नियमांनुसार विविध कारणांसाठी पैसे काढण्याच्या मर्यादेबाबत स्पष्टता देण्यात आली आहे, ज्यामुळे सभासदांमधील संभ्रम दूर होणार आहे:
– वैद्यकीय आणीबाणी: आजारपण किंवा वैद्यकीय उपचारांसाठी पैसे काढण्यावर कोणतीही कालमर्यादा किंवा संख्यात्मक बंधन नाही. गरजू सभासद सेवाकाळात आवश्यकतेनुसार कितीही वेळा क्लेम करू शकतात.
– उच्च शिक्षण: मुलांच्या उच्च शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी संपूर्ण सेवा कालावधीत जास्तीत जास्त 10 वेळा ॲडव्हान्स घेण्याची मुभा आहे.
– विवाह सोहळा: स्वतःचे, मुलांचे किंवा बहीण-भावाच्या विवाहासाठी संपूर्ण नोकरीच्या काळात जास्तीत जास्त 5 वेळा पैसे काढता येतील.
– गृहनिर्माण व कर्जफेड: घर खरेदी, प्लॉट खरेदी, घराचे बांधकाम, दुरुस्ती किंवा होम लोन परतफेडीसाठी 5 वेळा; तर इतर विशेष आणीबाणीच्या प्रसंगी 2 वेळा पैसे काढता येतील.

हेही वाचा – मोठी घोषणा! NSE IPO ची प्राइस बँड 1,700 ते 1,785 रुपये निश्चित; 17 सप्टेंबरपासून अर्जाची संधी, वाचा संपूर्ण टाइमलाइन

75 टक्क्यांपर्यंतची भरघोस रक्कम काढण्याची मुभा
ईपीएफओच्या नवीन धोरणानुसार, पात्र कर्मचाऱ्याला त्याच्या ईपीएफ (EPF) खात्यातील एकूण जमा शिल्लक रकमेच्या (Total Balance) तब्बल 75 टक्क्यांपर्यंत रक्कम ॲडव्हान्स म्हणून त्वरित मिळवता येईल. यामुळे अचानक मोठ्या आर्थिक गरजेला सामोरे जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. वैद्यकीय किंवा तातडीच्या गरजा पूर्ण करताना कर्मचाऱ्यांना खाजगी कर्जाचा किंवा व्याजाचा ताण सहन करावा लागणार नाही.

किमान 12 महिन्यांच्या सेवेची अट लागू
पीएफ खात्यातून 75 टक्क्यांपर्यंतची रक्कम ॲडव्हान्स म्हणून काढण्यासाठी कर्मचाऱ्याने ईपीएफ प्रणालीमध्ये किमान 12 महिन्यांचा सेवा कालावधी पूर्ण केलेला असणे बंधनकारक आहे. ही अट पूर्ण करणारे सर्व पात्र सदस्य आता कोणत्याही क्लिष्ट प्रक्रियेशिवाय ऑनलाइन प्रणालीद्वारे आपल्या हक्काच्या पैशांसाठी क्लेम अर्ज करू शकतात. या सुधारणांमुळे पीएफ क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया अधिक जलद आणि पारदर्शक होण्यास मदत होईल.

हेही वाचा – Pune MAHADA Lottery : फक्त 13 लाखांपासून फ्लॅट मिळवा! म्हाडाची पुणेसह 'या' प्राईम सिटीमध्ये मेगा लॉटरी; अर्ज करण्याची शेवटची तारीख?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number