सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीचं समन्स

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी याना ईडीने नोटीस बजावली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. काँग्रेसने हे सूडाचं राजकारण असल्याचे म्हटले आहे. तर ईडी कडून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना चौकशीसाठी ८ जूनला हजार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भाजपने सुडापोटी कारवाई केली आहे अशी माहिती काँग्रेस ने पत्रकार […]

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीचं समन्स

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी याना ईडीने नोटीस बजावली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. काँग्रेसने हे सूडाचं राजकारण असल्याचे म्हटले आहे. तर ईडी कडून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना चौकशीसाठी ८ जूनला हजार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भाजपने सुडापोटी कारवाई केली आहे अशी माहिती काँग्रेस ने पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.
आरोपाला उत्तर देण्यासाठी काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी घेतली पत्रकार परिषद काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी आणि रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आम्ही ईडीच्या नोटीशीला घाबरणार नाही असे रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले. आम्ही या नोटीशीला घाबरणार नाही आणि केंद्र सरकारसमोर झुकणार नाही असे ही रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे .

काय आहे नेमकं प्रकरण?

नॅशनल हेराल्ड’ वर्तमानपत्र पंडित जवाहरलाल नेहरु यांनी सुरू केलं होतं.

हे काँग्रेसचं मुखपत्र समजलं जायचं.

काही काळातच हे वर्तमानपत्र बंद पडलं.

2012 मध्ये ‘यंग इंडिया’ कंपनीनं वर्तमानपत्राचे हक्क पुन्हा विकत घेतलं.

सोनिया आणि राहुल गांधी ‘यंग इंडिया’ कंपनीचे संचालक

हक्क घेताना 1600 कोटींची संपत्ती फक्त 50 लाखांत घेतल्याचा आरोप

भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांचा आरोप

नॅशनल हेराल्डमध्ये यंग इंडिया, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा हिस्सा

राहुल आणि सोनिया यांना फसवणूक आणि षडयंत्र रचल्याप्रकरणी दोषी ठरवलं

पटियाला हाऊस न्यायालयानं ठरवलं दोषी

यंग इंडियाने फक्त 50 लाख रुपयांच्या बदल्यात असोसिएट जर्नल्सचे मालकी हक्क मिळवल्याचा आरोप

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number