Divyastra Mk3 Loitering Munition Test 2026: स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने एक अत्यंत ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. 11 ऑगस्ट 2026 रोजी देशातच विकसित करण्यात आलेल्या ‘Divyastra Mk3’ या मानवरहित जेट-पावर्ड ‘लोइटरिंग म्यूनिशन’ने (आत्मघाती ड्रोन) यशस्वी गगनभरारी घेतली. उत्तर प्रदेशातील एका विशेष टेस्टिंग एअरस्ट्रिपवरून या विमानाचे चाचणी उड्डाण पार पडले. हवेत दीर्घकाळ घिरट्या घालत शत्रूच्या तळांवर नजर ठेवणे आणि अचूक हल्ला करणे या वैशिष्ट्यांसह या अत्याधुनिक यंत्रणेची रचना करण्यात आली आहे.
अवघ्या आठ महिन्यांत निर्मिती; संपूर्णपणे भारतीय प्रोपल्शन तंत्रज्ञानाचा वापर
लखनऊस्थित ‘Kawa UAV Pvt. Ltd.’ (HoverIt) या डिफेन्स स्टार्टअप कंपनीने अवघ्या 8 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत या संपूर्ण प्रकल्पाची संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. या विमानाला ‘DG Propulsion’ या भारतीय कंपनीने बनवलेल्या टर्बोजेट इंजिनची ताकद मिळाली आहे. विशेष म्हणजे या चाचणी दरम्यान भारतीय इंजिनने सर्व टप्प्यांवर उत्तम कामगिरी बजावली. परदेशी जेट इंजिन किंवा क्रिटिकल सब-सिस्टीमवर थोडेही अवलंबून न राहता संपूर्ण स्वदेशी बनावटीचा जेट-पावर्ड लोइटरिंग म्यूनिशन उडवण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे.
‘भारत बनावट, भारतातच उड्डाण’; सोशल मीडियावर ऐतिहासिक यशाची घोषणा
HoverIt या कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर या यशाची माहिती देताना हा ‘आत्मनिर्भर भारता’चा जिवंत पुरावा असल्याचे म्हटले आहे. ‘यात कोणतेही आयात केलेले इंजिन नाही किंवा परदेशी सिस्टीम नाही; हे पूर्णपणे भारतात बनवले गेले असून भारतातच उडवले गेले आहे,’ असे कंपनीने अभिमानाने सांगितले. या जेटमध्ये भारतीय एअरफ्रेम, भारतीय जेट इंजिन, स्वदेशी सॉफ्टवेअर आणि फायरपावरचा वापर करण्यात आला आहे.
The Sky Has Changed. INTRODUCING DIVYAASTRA Mk3. India’s first indigenous jet-powered loitering munition to take flight. ?? Indian airframe.
Indian jet engine.
Indian autonomy.
Indian firepower. Powered by an indigenous jet engine developed by DG Propulsion, Divyastra Mk3… pic.twitter.com/O9Ne8K9YFZ — Hoverit (@KAWAUAVPVTLTD) August 16, 2026
शत्रूचे बंकर अन् एअर डिफेन्स उद्ध्वस्त करण्याची क्षमता; खाजगी क्षेत्राची मोठी झेप
‘Divyastra Mk3’ च्या यशामुळे शत्रूचे बंकर, रडार आणि एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त करण्यासाठी भारताला एक नवे आणि शक्तिशाली शस्त्र मिळाले आहे. भारताला अत्याधुनिक आणि ऑटोनॉमस हवाई संरक्षण प्रणालीत स्वावलंबी बनवण्यासाठी खाजगी डिफेन्स कंपन्या बजावत असलेली भूमिका या प्रयोगातून अधोरेखित झाली आहे. 2026 च्या सुरुवातीला सुरू झालेल्या या प्रोजेक्टने अवघ्या काही महिन्यांत मिळालेल्या यशाने भारतीय एअरोस्पेस क्षेत्राची नवी ताकद जगासमोर आणली आहे.