Surya Grahan and Deep Amavasya 2026 : दीप अमावस्येला सूर्यग्रहणाचा दुर्मिळ योग! जाणून घ्या, पूजा कशी करावी आणि सुतक काळ लागू होईल का

महाराष्ट्रातील महत्त्वाची धार्मिक परंपरा असलेली 'दीप अमावस्ये'ला दिव्यांची पूजा कशी करावी, जाणून घेऊ..

Surya Grahan and Deep Amavasya 2026 : दीप अमावस्येला सूर्यग्रहणाचा दुर्मिळ योग! जाणून घ्या, पूजा कशी करावी आणि सुतक काळ लागू होईल का

Surya Grahan and Deep Amavasya 2026: पंचांगानुसार, उद्या 12 ऑगस्ट 2026 रोजी आषाढ अमावस्या म्हणजेच महाराष्ट्रातील महत्त्वाची धार्मिक परंपरा असलेली 'दीप अमावस्या' साजरी होणार आहे. यावर्षी अमावस्येच्या तिथीलाच खग्रास सूर्यग्रहणाची खगोलीय घटना घडणार असल्याने भाविकांमध्ये पूजेबाबत मोठा भ्रम निर्माण झाला आहे. आषाढ अमावस्या तिथी 12 ऑगस्टला पहाटे 1:52 वाजता सुरू होऊन रात्री 11:06 वाजता समाप्त होणार आहे. आषाढाची सांगता करून 13 ऑगस्टपासून पवित्र श्रावण महिना सुरू होत असल्याने, दीपपूजनासाठी 12 ऑगस्ट हाच दिवस अत्यंत योग्य मानला गेला आहे.

भारतात ग्रहण दिसणार नाही; सूतक काळ लागू नाही, 'या' वेळेत करा दीपपूजन
12 ऑगस्टचे सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार रात्रीच्या वेळी होत असल्याने ते भारतातून कुठेही दिसणार नाही. त्यामुळे धार्मिक शास्त्रानुसार भारतात या ग्रहणाचा कोणताही सूतक काळ किंवा वेध पाळण्याची गरज नाही.
– दीपपूजनासाठी सूर्यास्तानंतरचा प्रदोषकाळ, म्हणजेच सायंकाळी 6:45 ते रात्री 8:15 ही वेळ सर्वोत्तम मानली गेली आहे.
– अंधाराला दूर सारून प्रकाशाचे पूजन करणे हा या पूजेचा मुख्य हेतू असल्याने, नेहमीप्रमाणे संध्याकाळी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून आनंदात दीपपूजन पार पाडावे.

घरगुती दीपपूजनाची सोपी अन् योग्य विधी
– दीप अमावस्येला सकाळी घर आणि देवघर स्वच्छ करून घ्यावे.
– संध्याकाळी पूजेच्या वेळी घरातील सर्व समई, पणत्या आणि दिवे धुऊन पाटावर किंवा तांदळाच्या आसनावर मांडावेत.
– दिव्यांना हळद-कुंकू, अक्षता आणि फुले अर्पण करून तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करावा.
– पूजेच्या वेळी 'ॐ दीपज्योतिः परब्रह्म, दीपज्योतिर्जनार्दनः…' या मंत्राचा जप करत दिव्यांची आरती करावी.
– या दिवशी घरातील वंशाच्या दिव्याचे (मुलांचे) ओवाळण करून सुख, समृद्धी आणि आरोग्याची प्रार्थना करण्याची परंपरा आहे.

हेही वाचा – Gatari Amavasya 2026: आषाढ अमावस्येला 'गटारी' नाव कसे पडले? जाणून घ्या या दिवसाचे मूळ नाव, धार्मिक आणि शास्त्रीय महत्त्व

'गटारी' साजरी करताना काळजी घ्या; अन्यथा पितृदोष ओढवेल!
आषाढ अमावस्येला लोकसंस्कृतीत 'गटारी अमावस्या' म्हणूनही ओळखले जाते. श्रावणात मांसाहार-मद्यपान वर्ज्य असल्याने अनेकजण या दिवशी मनसोक्त पार्टी करतात. मात्र, धार्मिक दृष्टिकोनातून हा अतिशय पवित्र आणि पितरांच्या पूजनाचा दिवस मानला जातो. जर या दिवशी मद्यपान किंवा अयोग्य कृत्ये केली, तर पितरांचा रोष ओढवू शकतो असा शास्त्रांचा इशारा आहे. सेलिब्रेशनच्या नादात केलेल्या चुकीच्या कृत्यांमुळे आयुष्यात अडचणी, संकटे आणि पितृदोषाचा सामना करावा लागू शकतो.

पितरांचे आशीर्वाद अन् समृद्धीसाठी 'हे' नियम नक्की पाळा
– दीप अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानाच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावे.
– सकाळी देवांची पूजा आणि संध्याकाळी पितरांचे तर्पण व दीपपूजन करून नैवेद्य दाखवावा.
– यामुळे पितृदोष दूर होऊन घरामध्ये अखंड सुख-समृद्धी नांदते.

त्यामुळे आषाढ अमावस्येला पार्टी किंवा वाईट सवयींपेक्षा सात्त्विकतेला प्राधान्य देऊन, दिव्यांचे आणि पितरांचे मनोभावे पूजन करणेच श्रेयस्कर ठरेल.

हेही वाचा – Surya Grahan August 2026 : वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण 12 ऑगस्टला! जाणून घ्या वेळ अन् भारतातील प्रभाव

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number