शिवपुतळ्याच्या चौथऱ्यावर काँग्रेसचे चप्पल घालून आंदोलन

महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागावी यासाठी आज काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. दरम्यान, नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. मात्र, यावेळी काँग्रेसने चप्पल घालून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याच्या खालच्या बाजूला उभे राहत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. त्यामुळे काँग्रेसचे आंदोलन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. पंतप्रधान नरेंद्र […]

शिवपुतळ्याच्या चौथऱ्यावर काँग्रेसचे चप्पल घालून आंदोलन

महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागावी यासाठी आज काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. दरम्यान, नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले.

मात्र, यावेळी काँग्रेसने चप्पल घालून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याच्या खालच्या बाजूला उभे राहत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. त्यामुळे काँग्रेसचे आंदोलन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यामुळे राज्याचा अपमान झाल्याचा आरोप करत काँग्रेसने आंदोलन केले आहे. राज्यात अनेक ठिकाणी काँग्रेसकडून पंतप्रधानांविरोधात आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

मुंबईतील नरीमन पॉईंट परिसरात काँग्रेसने शर्म करो मोदी आंदोलन केले. महाराष्ट्राच्या अपमानाप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी, यासाठी काँग्रेस आक्रमक झाला असून राज्यात अनेक ठिकाणी निदर्शने काढण्यात आली. तसेच येवला विंचूर चौफुली येथे काँग्रेस कमिटीच्यावतीने शर्म करो मोदी आंदोलन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number