ऐन लग्नसमारंभात भीषण अग्नितांडव! 22 जणांचा होरपळून मृत्यू, रस्त्यावर मृतदेह…, जखमी अवस्थेतील लोक; बचावकार्य करणारेही हळहळले

आगीमुळे हाहाकार माजला आणि लग्नाचा आनंद क्षणात आक्रोशात बदलला. काही मिनिटांतच संपूर्ण परिसर धुराच्या लोटांनी वेढला गेला.

ऐन लग्नसमारंभात भीषण अग्नितांडव! 22 जणांचा होरपळून मृत्यू, रस्त्यावर मृतदेह…, जखमी अवस्थेतील लोक; बचावकार्य करणारेही हळहळले

Congo Wedding Fire: एका लग्नसोहळ्यादरम्यान अचानक लागलेल्या भीषण आगीत किमान 22 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. एका इमारतीमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीनंतर हा आग लागल्याचा प्रकार घडला. हाहाकार माजल्यामुळे लग्नाचा आनंद क्षणात आक्रोशात बदलला आणि संपूर्ण परिसर धुराच्या लोटांनी वेढला गेला. काही वेळातच रस्त्याच्या एका बाजूला मृतदेह आणि दुसरीकडे विव्हळणारे जखमी लोक पडल्याचे हृदयद्रावक दृश्य दिसत होते.

अरुंद मार्ग अन् बाहेर पडण्यासाठी धावपळ
इमारतीच्या आत आग वेगाने पसरत असताना बाहेर पडण्याचे मार्ग अत्यंत अरुंद असल्याने मोठ्या प्रमाणावर चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. धुराचे साम्राज्य पसरल्यामुळे अनेक लोकांना श्वास गुदमरून बाहेर पडता आले नाही, तर काहींचा आगीच्या तीव्र ज्वाळांमध्ये होरपळून मृत्यू झाला. आगीतून वाचलेले नागरिक आणि प्रत्यक्षदर्शी जखमींना मदतीचा हात देत कसेबसे रस्त्याच्या कडेला घेऊन आले. मध्य आफ्रिकेतील डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगोची राजधानी किन्शासा येथे ही घटना घडली. उत्तर किन्शासातील लिंगवाला (Lingwala) परिसरातील एका इमारतीत हा लग्नसोहळा सुरू होता.

हेही वाचा – Nepal Flood: चीन पहिल्यांदाच खरं बोलला! सांगितली गिरोंग इमिग्रेशन सेंटरमधील दुर्घटनेची भयावह वस्तुस्थिती; 31 मृतदेह आणि…

प्रशासनाकडून तातडीने पाहणी अन् मृतांचा आकडा वाढण्याची भीती
लिंगवाला भागाचे महापौर नॉर्बर्ट मुशिंगा (Norbert Mushinga) यांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक तपासात 22 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली असली, तरी गंभीर जखमींची संख्या पाहता हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी देशाचे उपपंतप्रधान आणि गृहमंत्री जॅक्वेमिन शबानी (Jacquemin Shabani) यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व ही अत्यंत दुःखद राष्ट्रीय शोकांतिका असल्याचे सांगत तीव्र शोक व्यक्त केला.

आगीचे कारण अस्पष्ट; अपुऱ्या पायाभूत सुविधांचा प्रश्न
या भीषण आगीचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नसून स्थानिक पोलीस व अग्निशामक दलाकडून तपास सुरू आहे. किन्शासासारख्या दाट लोकवस्तीच्या शहरांमध्ये पुरेशा अग्निशामक यंत्रणेचा अभाव आणि अनधिकृत बांधकामामुळे अशा आगीच्या घटना वारंवार घडत असल्याचे समोर येत आहे. विशेषतः कोरड्या हवामानाच्या (Dry Season) काळात अशा दुर्घटनांमध्ये वाढ होत असून स्थानिक प्रशासनाच्या निष्काळजीपणाबाबत आता नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा – US Birthright Citizenship: अमेरिकेत जन्म-आधारित नागरिकत्वाच्या नियमात बदल; परदेशी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी नवीन धोरण जाहीर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number