Passport New Rules: लहान मुलांच्या पासपोर्टच्या नियमात मोठा बदल; वैधतेच्या कालावधीसह अर्जाच्या शुल्काबाबत परराष्ट्र मंत्रालयाची नवी नियमावली

पासपोर्टच्या नियमांमध्ये आणि शुल्कात झालेल्या या बदलांनंतर आता नवीन अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराचे वय, पासपोर्टचा प्रकार (सामान्य की तत्काळ) आणि पानांची संख्या व्यवस्थित तपासून घेणे गरजेचे आहे.

Passport New Rules: लहान मुलांच्या पासपोर्टच्या नियमात मोठा बदल; वैधतेच्या कालावधीसह अर्जाच्या शुल्काबाबत परराष्ट्र मंत्रालयाची नवी नियमावली

Child passport validity rules 2026: परराष्ट्र मंत्रालयाने लहान मुलांच्या पासपोर्टबाबतच्या नियमावलीत महत्त्वपूर्ण सुधारणा केली असून 17 सप्टेंबर 2026 रोजी 'पासपोर्ट दुरुस्ती नियम, 2026' ची राजपत्रित अधिसूचना (Gazette Notification) प्रसिद्ध केली आहे. नवीन नियमांनुसार, 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी जारी करण्यात येणाऱ्या 36 पानांच्या पासपोर्टची वैधता आता केवळ मुलाच्या 15 व्या वर्षापर्यंत मर्यादित नसेल. नवीन नियमानुसार या पासपोर्टची वैधता आता 5 वर्षे किंवा मुलाचे वय 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत (यापैकी जे आधी पूर्ण होईल ते) लागू राहील.

पासपोर्टच्या नवीन वैधतेचे गणित आणि वयोमर्यादेचे नियम
लहान मुलांच्या पासपोर्टची मुदत कशी निश्चित होईल, हे समजून घेण्यासाठी खालील उदाहरणे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे:
10 वर्षांच्या मुलाचा पासपोर्ट: जर एखाद्या मुलाचा पासपोर्ट वयाच्या 10 व्या वर्षी तयार झाला असेल, तर तो पुढील 5 वर्षे म्हणजेच वयाच्या 15 व्या वर्षापर्यंतच वैध राहील.
14 वर्षांच्या मुलाचा पासपोर्ट: जर एखाद्या मुलाने वयाच्या 14 व्या वर्षी पासपोर्ट बनवला असेल, तर 18 वर्षे पूर्ण होण्यासाठी 4 वर्षे शिल्लक असल्यामुळे तो पासपोर्ट पुढील 4 वर्षांसाठीच वैध मानला जाईल.
नवा पासपोर्ट आवश्यक: या दोन्ही स्थितीत निर्धारित मुदत संपताच किंवा वय 18 पूर्ण होताच पुढील प्रवासासाठी नवीन पासपोर्ट काढावा लागेल.

18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या पासपोर्ट शुल्कात झालेली वाढ
परराष्ट्र मंत्रालयाने लहान मुलांच्या पासपोर्ट शुल्कात वाढ केली असून नवीन दर खालीलप्रमाणे लागू करण्यात आले आहेत:
सामान्य पासपोर्ट (36 पाने): आता 1,750 रुपये शुल्क आकारले जाईल (यापूर्वी हे शुल्क 1,000 रुपये होते).
तत्काळ पासपोर्ट (36 पाने): तत्काळ सेवेसाठी आता 4,250 रुपये मोजावे लागतील (यापूर्वी यासाठी 3,000 रुपये मोजावे लागत होते).

हेही वाचा – RAC Waiting: रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर; आरएसी आणि वेटिंग लिस्टवरील प्रवाशांना आता आपोआप मिळणार रिकामी बर्थ

प्रौढांसाठीचे नवीन पासपोर्ट शुल्क आणि डुप्लिकेट पासपोर्टचे दर
प्रौढांसाठी (18 वर्षे किंवा त्याहून अधिक) आणि डुप्लिकेट पासपोर्टसाठीही दरांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे:
सामान्य पासपोर्ट (36 पाने): जुन्या 1,500 रुपयांऐवजी आता 2,500 रुपये आकारले जातील.
तत्काळ पासपोर्ट (36 पाने): जुन्या 3,500 रुपयांऐवजी आता 5,000 रुपये शुल्क मोजावे लागेल.
जंबो पासपोर्ट (60 पाने): सामान्य सेवेसाठी 3,500 रुपये (पूर्वी 2,000 रुपये) आणि तत्काळ सेवेसाठी 6,000 रुपये (पूर्वी 4,000 रुपये) लागतील.
डुप्लिकेट पासपोर्ट (60 पाने): हरवलेल्या किंवा खराब झालेल्या 60 पानांच्या डुप्लिकेट पासपोर्टसाठी आता 5,500 रुपयांऐवजी थेट 8,500 रुपये शुल्क भरावे लागेल.

परदेश प्रवासाचे नियोजन करताना नवीन दरांची नोंद घेणे आवश्यक
पासपोर्टच्या नियमांमध्ये आणि शुल्कात झालेल्या या महत्त्वपूर्ण बदलांनंतर आता नवीन अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराचे वय, पासपोर्टचा प्रकार (सामान्य की तत्काळ) आणि पानांची संख्या व्यवस्थित तपासून घेणे गरजेचे आहे. विशेषतः लहान मुलांच्या पालकांनी पासपोर्टच्या वैधतेची मुदत त्यांच्या वयाशी जोडलेली असल्यामुळे परदेश प्रवासाचे आणि कागदपत्रांचे नियोजन आधीपासूनच करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा – Tech Hub layoffs: भारतात टेक कंपनीत मोठी नोकरकपात; एकाच झटक्यात 50 टक्के कर्मचाऱ्यांना दाखवला घरचा रस्ता

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number