Priya Bapat: नाट्यगृहासाठी कोट्यवधींचा खर्च, पण…, कोट्यवधींच्या खर्चानंतरही प्रिया बापट यांनी मागितली प्रेक्षकांची माफ; कारण काय?

Priya Bapat and Umesh Kamat apologized to Audience: कितीही ओटीटी प्लॅटफॉर्म्स आले तरी मराठी रंगभूमीवरील व्यावसायिक नाट्यप्रयोगांची पाटी खूपदा हाऊसफुल अशी पाहायला मिळते

Priya Bapat: नाट्यगृहासाठी कोट्यवधींचा खर्च, पण…, कोट्यवधींच्या खर्चानंतरही प्रिया बापट यांनी मागितली प्रेक्षकांची माफ; कारण काय?

Priya Bapat and Umesh Kamat apologized to Audience: कितीही ओटीटी प्लॅटफॉर्म्स आले तरी मराठी रंगभूमीवरील व्यावसायिक नाट्यप्रयोगांची पाटी खूपदा हाऊसफुल अशी पाहायला मिळते. म्हणूनच नाटकांत काम करणारे सर्वच कलाकार रसिक-प्रेक्षकांना 'मायबाप' असे संबोधतात. परंतु नाट्यगृहांची दुरावस्था ही कलाकारांबरोबरच प्रेक्षकांना देखील त्रासदायक ठरत आहे.

चित्रपट, ओटीटी माध्यमांबरोबरच रंगभूमीवरची कमाल जोडी म्हणजे प्रिया बापट-उमेश कामत. आपल्या उत्तम अभिनय कौशल्याने ते नेहमी प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. नुकताच त्यांचा ' जर तर ची गोष्ट ' हा नाट्य प्रयोग मीरारोड येथील भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहात पार पडला. परंतु प्रयोगादरम्यान बंद पडलेले एसी , दुर्गंधीयुक्त स्वच्छतागृहे, मोडकळीस आलेल्या खुर्च्या आणि तांत्रिक सुविधांचा अभाव पडल्यामुळे अभिनेत्री प्रिया बापट यांना प्रेक्षकांची माफी मागावी लागली.

तसेच नाट्यगृहात लाईटची योग्य व्यवस्था नसल्याने कलाकारांना पर्यायी लाईट लावून प्रयोग करावा लागला. कलाकारांबरोबरच प्रेक्षकांनासुद्धा या त्रासाची झळ  बसली. कारण वातानुकूलित यंत्रणा (AC) बंद असल्याच्या तक्रारीही समोर आल्या होत्या. यामुळे प्रिया बापट आणि उमेश कामत यांनी थेट प्रेक्षकांशी संवाद साधत अपुऱ्या सोयी-सुविविधांबाबत जाहीर माफी मागितली.

या त्रुटींमुळे मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रेक्षकांनी व राजकीय पक्षांनी पालक आयुक्तांचा निषेध करत नाट्यगृहात तातडीने सुविधा अद्ययावत कराव्यात अशी मागणी केली आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number