EPFO Portal Resumed: PF खातेधारकांना मोठा दिलासा, तब्बल 1 आठवड्यानंतर EPFO चे पोर्टल अखेर सुरू; काय बदललं? जाणून घ्या

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची (EPFO) विस्कळीत झालेली ऑनलाइन सेवा तब्बल 7 दिवसांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर पूर्ववत झाली आहे.

EPFO Portal Resumed: PF खातेधारकांना मोठा दिलासा, तब्बल 1 आठवड्यानंतर EPFO चे पोर्टल अखेर सुरू; काय बदललं? जाणून घ्या

EPFO Portal Resumed: देशातील करोडो नोकरदारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची (EPFO) विस्कळीत झालेली ऑनलाइन सेवा तब्बल 7 दिवसांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर पूर्ववत झाली आहे. मेंटेनन्स आणि तांत्रिक कारणांमुळे बंद असलेले हे पोर्टल आता पूर्ण क्षमतेने सुरू झाले असून, कोट्यवधी पीएफ खातेधारकांना आणि कंपन्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. भविष्यात युजर्सना अधिक वेगवान, सुरक्षित आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी या काळात डेटाबेस आणि सॉफ्टवेअर अपग्रेडेशनचे मोठे काम करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दाव्यांच्या प्रक्रियेला लागणार अधिक वेळ; पुढील 2 आठवडे महत्त्वाचे
EPFO ने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, पोर्टलवरील सर्व महत्त्वाच्या सेवा पुन्हा सुरू झाल्या असल्या, तरी सुरुवातीच्या काळात कामाचा वेग काहीसा संथ असू शकतो. पुढील 2 आठवड्यांत प्रलंबित असलेले सर्व दावे (claims) आणि अर्ज टप्प्याटप्प्याने निकाली काढले जातील. डेटा अपग्रेड झाल्यामुळे प्रत्येक अर्जाची आणि नोंदींची अत्यंत काटेकोरपणे पडताळणी केली जाणार आहे. परिणामी, पीएफ खात्यातून पैसे काढणे (Withdrawal), पीएफ ट्रान्सफर करणे किंवा इतर ऑनलाइन दुरुस्त्यांसाठी नेहमीपेक्षा काही दिवस जास्त वेळ लागण्याची शक्यता आहे.

पीएफ सदस्यांना घाई गडबड न करण्याचे आवाहन
वेबसाईट सुरू झाल्यानंतर युजर्सची एकाच वेळी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन EPFO ने सर्व खातेधारक आणि नियोक्त्यांना (Employers) संयम राखण्याचे आवाहन केले आहे. खातेधारकांनी पीएफ पोर्टलवर वारंवार लॉग इन करणे किंवा एकाच दाव्यासाठी पुन्हा-पुन्हा अर्ज करणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे. असे केल्याने मुख्य सर्व्हरवर अनावश्यक ताण निर्माण होऊन सिस्टीम पुन्हा संथ होऊ शकते, ज्यामुळे तुमच्याच कामाला अधिक विलंब होण्याचा धोका आहे.

हेही वाचा – Instagram Controversial Ads: केंद्र सरकारचा मेटाला मोठा दणका; आक्षेपार्ह इंस्टाग्राम जाहिरातींप्रकरणी समन्स; 3 दिवसांत दुसऱ्यांदा नोटीस

काय बदलले आणि कधी झाली वेबसाईट सुरू?
सध्या तरी या नवीन अपग्रेडेशनमध्ये युजर्ससाठी कोणतेही दृश्यमान नवीन फीचर्स किंवा पर्याय जोडण्यात आलेले नाहीत. केवळ अंतर्गत प्रणालीचा दर्जा, सुरक्षितता आणि वेग सुधारण्यासाठी हे सॉफ्टवेअर अपडेट करण्यात आले आहे. या मेंटेनन्सच्या कामासाठी विभागाला अनेकदा मुदतवाढ द्यावी लागली होती. सुरुवातीला हे काम 28 जूनपर्यंत पूर्ण होऊन 29 जून रोजी सेवा सुरू होणार होत्या. मात्र, तांत्रिक कारणांमुळे ही मुदत आधी 1 जुलैपर्यंत वाढवली गेली आणि अखेर प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर 3 जुलैच्या दुपारपासून हे पोर्टल पूर्णपणे कार्यरत झाले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number