Barbeque Fire Incident: बार्बेक्यूचा आनंद बेतला जीवावर; आगीचा भडका उडाल्याने नवविवाहित महिला गंभीर भाजली

दार्जिलिंग जिल्ह्यातील सिट्टोंग (Sittong) येथील एका होमस्टेवर बार्बेक्यू सुरू असताना झालेल्या अग्नितांडवात एका नवविवाहित महिलेला गंभीररीत्या भाजले आहे.

Barbeque Fire Incident: बार्बेक्यूचा आनंद बेतला जीवावर; आगीचा भडका उडाल्याने नवविवाहित महिला गंभीर भाजली

Barbeque Fire Incident: पश्चिम बंगालमधील एका नवविवाहित जोडप्याची डोंगराळ भागातील आनंदाची 'हनिमून' सहल एका भीषण आणि दुर्दैवी अपघातामुळे शोकाकुल झाली आहे. दार्जिलिंग जिल्ह्यातील सिट्टोंग (Sittong) येथील एका होमस्टेवर बार्बेक्यू सुरू असताना झालेल्या अग्नितांडवात एका नवविवाहित महिलेला गंभीररीत्या भाजले आहे. निकिता दास असे या पीडित महिलेचे नाव असून, ती सध्या सिलीगुडी येथील एका खाजगी नर्सिंग होममध्ये अत्यंत गंभीर अवस्थेत जीवनाशी झुंज देत आहे. या प्रकरणी होमस्टे व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त होत असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आगीत द्रवरूप पदार्थ ओतल्याने अचानक भडका 

उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या निकिता आणि तिचा पती सौविक यांचे सुमारे 2 महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. हे जोडपे आपल्या हनिमूनसाठी सिट्टोंग येथील एका होमस्टेमध्ये उतरले होते. 13 सप्टेंबरच्या रात्री होमस्टेमध्ये बार्बेक्यूचे आयोजन करण्यात आले होते. समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे जोडपे बार्बेक्यूजवळ बसलेले दिसत आहे. त्याच वेळी समोर उभा असलेला एक व्यक्ती आगीची तीव्रता वाढवण्यासाठी एका कॅनमधील ज्वलनशील द्रव पदार्थ थेट आगीत ओतताना दिसतो. द्रव ओतताच काही क्षणांतच आग अचानक तीव्रतेने भडकली आणि आगीच्या भयानक ज्वाळा थेट निकिता यांच्या अंगावर झेपावल्या.

हेही वाचा – Nithari Killings Case : 20 वर्ष जुन्या निठारी हत्याकांड प्रकणातील मुख्य आरोपी सुरेंद्र कोळीचा संशयास्पद मृत्यू; चहाच्या टपरीवर आढळला मृतदेह

पती अन् उपस्थितांची वाचवण्यासाठी धावपळ 

आगीच्या वेढ्यात सापडलेली निकिता वेदनेने ओरडत खाली पडली. परिसरात एकच गोंधळ उडाल्यानंतर तिच्या समाजात असलेल्या पतीने तिला वाचवण्यासाठी तातडीने धाव घेतली. तसेच आगीत द्रव ओतणाऱ्या व्यक्तीनेही आपला टी-शर्ट काढून आग विझवण्याचा प्रयत्न केला. निकिताच्या शरीराचा मोठा भाग या आगीत गंभीरपणे भाजला गेला आहे. सुरुवातीला तिला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले, परंतु प्रकृती वेगाने खालावल्याने तिला सिलीगुडी येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले.

होमस्टे व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचा आरोप 

घटनेनंतर होमस्टे व्यवस्थापनाने कसलीही आपत्कालीन किंवा वैद्यकीय मदत पुरवली नाही, असा गंभीर आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. अपघाताच्या वेळी सुरक्षेची कोणतीही उपाययोजना किंवा अग्निशामक साधने तेथे उपलब्ध नव्हती, असाही दावा केला जात आहे. या आरोपांवर होमस्टे व्यवस्थापनाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. दरम्यान, पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा तपास सुरू केला असून, सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number