Nepal Flood : पुराच्या विळख्यात पाण्याखाली गेली बँक; 8 तासांच्या अथक मोहिमेनंतर बँकेतून 50 कोटींचे सोने अन् 1.5 कोटींची रोकड जप्त

त्रिशुली येथील 'ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट बँक'च्या शाखेतून तब्बल 50 कोटी रुपयांचे सोने आणि 1.5 कोटी रुपयांची रोकड सुरक्षितपणे बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले आहे.

Nepal Flood : पुराच्या विळख्यात पाण्याखाली गेली बँक; 8 तासांच्या अथक मोहिमेनंतर बँकेतून 50 कोटींचे सोने अन् 1.5 कोटींची रोकड जप्त

Nepal Flood :  नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे सर्वत्र भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. बचावकार्यादरम्यान नुवाकोटमधील त्रिशुली येथील 'ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट बँक'च्या शाखेतून तब्बल 50 कोटी रुपयांचे सोने आणि 1.5 कोटी रुपयांची रोकड सुरक्षितपणे बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले आहे. 26 ऑगस्ट रोजी 'भोटे कोशी' नदीला आलेल्या भीषण पुरामुळे बँकेची ही इमारत पूर्णपणे पाण्याखाली गेली होती. प्रवाहाच्या वेगामुळे हे मौल्यवान साहित्य वाहून गेल्याची भीती होती; परंतु पुराचे पाणी ओसरल्यानंतर सुमारे 8 तास चाललेल्या कठीण मोहिमेनंतर सोने, चांदी आणि रोकड हस्तगत करण्यात आली. प्रशासनाने सर्व ऐवज कडक सुरक्षा व्यवस्थेत सुरक्षित स्थळी हलवला आहे.

मृतांची संख्या 903 वर; 4,247 नागरिक अद्याप बेपत्ता

नेपाळच्या 'नॅशनल डिझास्टर रिस्क रिडक्शन अँड मॅनेजमेंट ऑथॉरिटी'ने (NDRRMA) 31 ऑगस्ट 2026 रोजी दिलेल्या अहवालानुसार, या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 903 लोकांचे मृतदेह हाती आले आहेत. यामध्ये चितवनमधील 272, नवलपरासी पूर्वमधील 207 आणि नुवाकोटमधील 95 मृतदेहांचा समावेश आहे. अद्याप 4,247 लोक बेपत्ता असून यामध्ये नेपाळ पोलिसांचे 25, लष्कराचे 45 आणि सशस्त्र दलाचे 13 जवान समाविष्ट आहेत. याशिवाय जलविद्युत प्रकल्पातील 933 कर्मचारी आणि 592 परदेशी नागरिकही गायब आहेत. विविध रुग्णालयांमध्ये अनोळखी मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

हेही वाचा – Nepal Flood : मुख्याध्यापकाच्या 'त्या' एका निर्णयामुळे वाचला तब्बल 1643 विद्यार्थ्यांचा जीव; पूर येण्यापूर्वी नेमकं काय घडलं?

10,451 लोकांची सुरक्षित सुटका; बोगद्यांमध्ये मदतकार्यात मोठे आव्हान

विनाशकारी पुराच्या तडाख्यातून आतापर्यंत एकूण 10,451 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. नेपाळ लष्कराच्या हेलिकॉप्टरने 411 फेऱ्या मारून 252 परदेशी आणि 3,344 नेपाळी नागरिकांना एअरलिफ्ट केले आहे. या आपत्तीत 267 जण जखमी झाले असून 20,819 सुरक्षा कर्मचारी मदतकार्यात तैनात आहेत. दरम्यान, त्रिशूली जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यांमध्ये 4 ते 5 फूट साचलेला चिखल आणि ढिगाऱ्यामुळे तिथे अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात बचाव पथकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number