Ram Mandir CEO Post Interview: जानवे, आहार अन् धार्मिक सवयींवर प्रश्न! राम मंदिर सीईओ निवडीसाठी 5,200 अर्जदारांमधून 18 जणांची निवड

या अत्यंत महत्त्वाच्या पदाच्या शर्यतीत माजी सनदी अधिकारी आणि पोलीस दलातील अनुभवी चेहरे आघाडीवर आहेत.

Ram Mandir CEO Post Interview: जानवे, आहार अन् धार्मिक सवयींवर प्रश्न! राम मंदिर सीईओ निवडीसाठी 5,200 अर्जदारांमधून 18 जणांची निवड

Ram Mandir CEO Post Interview: अयोध्या येथील श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदाची निवड प्रक्रिया वेगाने पार पडत आहे. या उच्चपदस्थ पदासाठी देशभरातून प्राप्त झालेल्या सुमारे 5200 अर्जांमधून अंतिम 18 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. राम मंदिरात दानाच्या निधीमध्ये कथित गैरव्यवहाराचे आरोप समोर आल्यानंतर आणि 8 जणांना अटक झाल्यानंतर ट्रस्टचे माजी सरचिटणीस चंपत राय यांच्यासह 3 अधिकाऱ्यांना राजीनामा द्यावा लागला होता. या पार्श्वभूमीवर मंदिराचे आर्थिक आणि प्रशासकीय व्यवस्थापन अत्यंत पारदर्शक करण्यासाठी पूर्णवेळ सीईओ नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ऑनलाईन चाळणीनंतर अयोध्येत प्रत्यक्ष मुलाखतीचा टप्पा  
निवड प्रक्रियेच्या सुरुवातीला सर्व 18 उमेदवारांची ऑनलाईन मुलाखत घेण्यात आली होती. त्यानंतर अयोध्येत प्रत्यक्ष मुलाखतीचा टप्पा पार पडला, ज्यामध्ये 4 माजी आयएएस (IAS) अधिकाऱ्यांसह 8 उमेदवारांनी हजेरी लावली. प्रत्येक उमेदवाराची मुलाखत सुमारे 1 ते 2 तास चालली. या मुलाखतींदरम्यान केवळ उमेदवारांचे प्रशासकीय आणि नेतृत्व कौशल्यच नव्हे, तर त्यांची प्रभू रामावरील श्रद्धा, कौटुंबिक पार्श्वभूमी, गर्दी व्यवस्थापनाचा अनुभव आणि मंदिराच्या भविष्यातील वाटचालीबाबतची दूरदृष्टी तपासण्यात आली.  

34 मुद्द्यांचा गूगल फॉर्म अन् उमेदवारांना विचारलेले 18 प्रमुख प्रश्न  
प्रत्यक्ष मुलाखतीपूर्वी सर्व उमेदवारांना 34 मुद्द्यांचा एक विस्तृत गूगल फॉर्म भरून देणे अनिवार्य करण्यात आले होते. यामध्ये उमेदवारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, आहाराच्या सवयींबद्दल आणि धार्मिक निष्ठेबद्दल खालील प्रमुख प्रश्न विचारण्यात आले:  
– धार्मिक प्रथा व चिन्ह: तुम्ही जानवे परिधान करता का? तुम्ही डोक्यावर शिखा (शेंडी) ठेवता का?  
– आहार अन् व्यसन: तुम्ही पूर्णपणे शाकाहारी आहात की मांसाहारी भोजन करता? तुम्ही मद्यपान करता का?  
– धार्मिक निष्ठा व पोशाख: तुम्ही कट्टर हिंदू आहात का? तुम्हाला हिंदू धर्मपरंपरेनुसार कपडे परिधान करण्यास सोयीस्कर वाटेल का?  
– प्रशासकीय अनुभव: तुम्ही यापूर्वी कुठे काम केले आहे? सणासुदीच्या काळात मोठ्या धार्मिक गर्दीचे व्यवस्थापन कसे कराल?  
– श्रद्धा व दूरदृष्टी: तुमची प्रभू श्रीरामावर किती श्रद्धा आहे आणि राम मंदिराच्या धार्मिक-सामाजिक महत्त्वाबद्दल तुमची काय दृष्टी आहे?  

हेही वाचा – Trimbakeshwar Temple: श्रावणात त्र्यंबकेश्वरला VIP एन्ट्रीला ब्रेक! 13 ऑगस्टपासून दर्शन व्यवस्थेत मोठा बदल, कारण काय?

निवृत्त आयपीएस अन् आयएएस अधिकारी शर्यतीत
या अत्यंत महत्त्वाच्या पदाच्या शर्यतीत माजी सनदी अधिकारी आणि पोलीस दलातील अनुभवी चेहरे आघाडीवर आहेत. उत्तर प्रदेशचे माजी आयजी आणि लखनौच्या अलिगंज येथील ऐतिहासिक हनुमान मंदिराचे सचिव राहिलेले माजी आयपीएस अधिकारी राजेश पांडे यांच्यासह फैजाबादचे माजी जिल्हाधिकारी व निवृत्त आयएएस अधिकारी योगेश्वर मिश्रा यांनीही या मुलाखतीला सामोरे जाणे पसंत केले आहे. याशिवाय इतरही अनेक निवृत्त प्रशासकीय दिग्गज या शर्यतीत असून, अंतिम उमेदवाराची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल.  

3 सदस्यीय निवड समिती आणि अंतिम शिफारस  
या निवड प्रक्रियेसाठी उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती प्रमोद कोहली, निवृत्त लेफ्टनंट जनरल विश्वकांत चतुर्वेदी आणि शिर्डी साईबाबा संस्थानाचे माजी अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांची 3 सदस्यीय विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती मुलाखतींनंतर अंतिम 3 नावांची शिफारस ट्रस्टकडे करेल. त्यानंतर राम मंदिर ट्रस्टच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत अंतिम मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या नावाची घोषणा केली जाईल.

हेही वाचा – Tulja Bhavani Temple : तुळजाभवानीच्या चरणी भक्तीचा अनोखा नजराणा; पुण्यातील भाविकाकडून 967 ग्रॅमचा चांदीचा मुकुट अर्पण

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number