मुंबई, १० मे २०२३, प्रतिनिधी : सोनी मराठी वाहिनीवरील ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या मालिकेला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे. लवकरच या मालिकेत एक वळण येणार आहे. मालिकेत अभिनेता आस्ताद काळे येणार आहे. त्यामुळे आता पुढे मालिकेचे कथानक कसे वळण घेणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
यावेळी आस्ताद एक वेगळी भूमिका साकारणार आहे. मालिकेत दमदार पदार्पण करण्यासाठी आस्ताद आता सज्ज झालाय. यावेळी तो नेत्याची भूमिका साकारणार आहे.तर यात त्याच्या पात्राचे नाव सुहास साटम असे असून आता मालिकेत त्याच्या येण्याने एक वेगळेच वळण येणार आहे.