अंबादास दानवेंच पोलीस महासंचालकाना पत्र

औरंगाबादच्या महालगाव येथे आदित्य ठाकरे यांची सभा सुरू असताना एक दगड सभेच्या दिशेने भिरकावण्यात आला. सभा झाल्यानंतर गाडीवर देखील दगडफेक करण्यात आली. यावेळी तेथे असलेल्या लोकांकडून स्थानिक आमदार रमेश बोरनारे यांच्या समर्थनात घोषणाबाजी देखील सुरू होती. असा आरोप अंबादास दानवे यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी याबाबतचे एक पत्र […]

अंबादास दानवेंच पोलीस महासंचालकाना पत्र

औरंगाबादच्या महालगाव येथे आदित्य ठाकरे यांची सभा सुरू असताना एक दगड सभेच्या दिशेने भिरकावण्यात आला. सभा झाल्यानंतर गाडीवर देखील दगडफेक करण्यात आली. यावेळी तेथे असलेल्या लोकांकडून स्थानिक आमदार रमेश बोरनारे यांच्या समर्थनात घोषणाबाजी देखील सुरू होती. असा आरोप अंबादास दानवे यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी याबाबतचे एक पत्र राज्याचे पोलीस महासंचालक रजनी सेट यांना अंबादास दानवे यांनी दिला आहे.

अंबादास दानवे काय म्हणाले पत्रात ?

अंबादास दानवे यांनी पोलिस महासंचालकांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘आदित्य ठाकरे यांचा “शिव संवाद” यात्रेचा महाराष्ट्र दौरा चालू आहे. मंगळवारी ७ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील महालगांव येथे ग्राम सचिवालय समोरील मैदानात जाहीर सभा सुरू असताना तेथे अज्ञात जमावाकडून दगड मारण्यात आला. तर सभा संपवून तेथून निघताना आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर दगड मारण्यात आले. तसेच सभेच्या ठिकाणी हिंसक जमाव चालून आला. सदर प्रकरणी सुरक्षेमध्ये अक्षम्य कसूर झाली आहे. याची आपण गांभीर्याने नोंद घ्यावी, असे पोलिस महासंचालकांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number