Plane Accident: अलायन्स एअर विमानाचा अपघात; लँडिंगदरम्यान फुटलं टायर; 41 प्रवासी…

दिल्लीहून बिलासपूरला येणाऱ्या 'अलायन्स एअर'च्या विमानाचे लँडिंगदरम्यान डाव्या बाजूचे टायर अचानक फुटले. ही घटना सकाळी 11:00 वाजता घडली.

Plane Accident: अलायन्स एअर विमानाचा अपघात; लँडिंगदरम्यान फुटलं टायर; 41 प्रवासी…

Plane Accident: छत्तीसगडमधील बिलासपूर येथील बिलासा देवी केवट विमानतळावर शुक्रवारी सकाळी एक मोठा अनर्थ थोडक्यात टळला. दिल्लीहून बिलासपूरला येणाऱ्या ‘अलायन्स एअर’च्या विमानाचे लँडिंगदरम्यान डाव्या बाजूचे टायर अचानक फुटले. ही घटना सकाळी 11:00 वाजता घडली. विमान धावपट्टीवर उतरत असतानाच मोठा आवाज होऊन टायर फुटल्याने विमानात तीव्र कंपने निर्माण झाली आणि प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली. या विमानात (फ्लाइट क्रमांक 9I613) 37 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर्स असे एकूण 41 जण सवार होते. वैमानिकाने प्रसंगावधान राखून विमानावर नियंत्रण मिळवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

हेही वाचा – Nepal Flood Gold Theft: संतापजनक! निसर्गाच्या कोपानंतर दुर्दैवी लोकांच्या बेवारस पडलेल्या मृतदेहांवरील दागिने चोरण्याचा निंद्य प्रकार; व्हिडिओनंतर दोन नराधमांना बेड्या

सर्व प्रवासी सुरक्षित; पुढील उड्डाणे रद्द

अपघाताची माहिती मिळताच विमानतळ प्रशासनाने तातडीने आपत्कालीन यंत्रणा सक्रिय केली. विमानातील सर्व 37 प्रवासी आणि 4 कर्मचाऱ्यांना सुखरूपपणे बाहेर काढून टर्मिनल बिल्डिंगमध्ये सुरक्षित हलवण्यात आले. विमानतळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व प्रवासी पूर्णपणे सुरक्षित असून कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. या घटनेनंतर अलायन्स एअर कंपनीने बिलासपूरहून होणारी पुढील सर्व उड्डाणे तात्पुरती रद्द केली आहेत. तांत्रिक पथकाकडून विमानाची पाहणी केली जात असून घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

दरभंगा विमानतळावरील दुर्घटनेची पुनरावृत्ती

विमानाच्या लँडिंगदरम्यान टायर फुटण्याची ही काही पहिलीच घटना नाही. यापूर्वी बिहारमधील दरभंगा विमानतळावरही असाच भयानक प्रकार घडला होता. मुंबईहून आलेल्या ‘स्पाइसजेट’च्या (फ्लाइट SG-115) विमानाचे लँडिंग करताना अचानक चाक फुटले होते. त्यावेळी विमानात तब्बल 148 प्रवासी होते आणि खराब झालेले चाक रनवेवर फरफटत गेल्यामुळे प्रवाशांची घाबरगुंडी उडाली होती. त्या घटनेतही सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित बचावले होते. मात्र, बिलासपूर येथील या ताज्या घटनेमुळे विमान प्रवासादरम्यानच्या सुरक्षेचा आणि विमानांच्या देखभालीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number