Aditya Dhar On National Film Awards: धुरंधरची ऑस्कर एन्ट्री नाही, ‘आशा आहे की, जर आम्ही…’ काय म्हणाले आदित्य धर?

72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचा सोहळा दिनांक 22 सप्टेंबर, 2026 रोजी गुजरातमध्ये मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी आदित्य धर लिखित, निर्मित ‘आर्टिकल 370’ (Article 370) या सिनेमाला भरभरून प्रेम मिळाले. या चित्रपटाने हिंदीतील सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन (शाश्वत सचदेव), सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (यामी गौतम-धर) हे पुरस्कार पटकावलेत. यादरम्यान, ‘आर्टिकल 370’चे निर्माते आणि लेखक आदित्य धर […]

Aditya Dhar On National Film Awards: धुरंधरची ऑस्कर एन्ट्री नाही, ‘आशा आहे की, जर आम्ही…’ काय म्हणाले आदित्य धर?

72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचा सोहळा दिनांक 22 सप्टेंबर, 2026 रोजी गुजरातमध्ये मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी आदित्य धर लिखित, निर्मित ‘आर्टिकल 370’ (Article 370) या सिनेमाला भरभरून प्रेम मिळाले. या चित्रपटाने हिंदीतील सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन (शाश्वत सचदेव), सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (यामी गौतम-धर) हे पुरस्कार पटकावलेत. यादरम्यान, ‘आर्टिकल 370’चे निर्माते आणि लेखक आदित्य धर हे त्यांची पत्नी, अभिनेत्री यामी गौतम हिच्यासह या सोहळ्याला उपस्थित होते.

धुरंधरच्या बाबतीत आदित्य धर काय म्हणाले ?

या कार्यक्रमात आदित्य धर यांना ‘धुरंधर’ (Dhurandhar) सिनेमाबाबत विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी म्हटलं की, “आम्ही इथे ‘आर्टिकल 370’ (Article 370) साठी आलोत. आशा आहे की, जर आम्ही पुढच्या वर्षी पुन्हा आलो, तर नक्कीच ‘धुरंधर’बद्दल चर्चा करू…” यांच्या वक्तव्यावरुन एक गोष्ट स्पष्ट कळून येतेय की, दिग्दर्शकाला आशा आहे की, ‘धुरंधर’ सिनेमा किंवा त्या सिनेमाशी संबंधित कलाकार, राष्ट्रीय पुरस्कार जिंकू शकतील.

 

‘धुरंधर’ सिनेमाची एवढी क्रेझ का?

1. रणवीर सिंगचा वेगळा लूक- रणवीरच्या लूकने आणि कॅरेक्टरने रिलीजपूर्वीच प्रेक्षकांचं लक्ष वेधलं
2. अ‍ॅक्शन आणि थ्रिलरचा अंदाज-  सिनेमात मोठ्या प्रमाणावर अ‍ॅक्शन, सस्पेन्स आणि थ्रिल पाहायला मिळणार असल्याची उत्सुकता आहे.
3. मोठी स्टारकास्ट- रणवीर सिंगसोबत अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल यांसारखे कलाकार असल्याने चर्चेला मोठा वाव मिळाला.
4. देश आणि गुप्त मोहिमेची पार्श्वभूमी-  स्पाय-थ्रिलर आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित कथांना प्रेक्षकांकडून विशेष आकर्षण मिळतं.

Lalbaugcha Raja 2026: लालबागच्या राजाच्या दरबारी Hitman! रोहित शर्माचं सपत्नीक दर्शन, पाहा VIDEO

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number