Gold Rate Today : खरेदीदारांची चांदी! सोन्याच्या किमतीत अचानक मोठी घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर

दररोज वाढणाऱ्या भावांमुळे चिंतेत असलेल्या ग्राहकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला असून, व्यापारात किंचित मंदी आल्याचे चित्र सराफ बाजारात पाहायला मिळत आहे.<br/>

Gold Rate Today : खरेदीदारांची चांदी! सोन्याच्या किमतीत अचानक मोठी घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर

Gold Rate Today : जागतिक बाजारात चाललेल्या हालचाली आणि अमेरिकन चलनातील घडामोडींमुळे गेल्या काही दिवसांपासून मौल्यवान धातूंच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत होते. मागील आठवड्यात सतत होणाऱ्या दरवाढीमुळे सामान्य ग्राहकांचे बजेट कोलमडले होते. मात्र, आजच्या व्यापारी सत्रात या तेजीला ब्रेक लागला असून सोन्याच्या किमतीत घट नोंदवण्यात आली आहे. दररोज वाढणाऱ्या भावांमुळे चिंतेत असलेल्या ग्राहकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला असून, व्यापारात किंचित मंदी आल्याचे चित्र सराफ बाजारात पाहायला मिळत आहे.

तोळ्यामागे 770 रुपयांची कपात; ग्राहकांसाठी योग्य संधी
सध्या लग्नकार्य आणि आगामी उत्सवांचे दिवस जवळ येत असल्याने अनेक कुटुंबे दागिने खरेदीचे नियोजन करत आहेत. अशा काळात आज झालेली 770 रुपयांची घसरण ग्राहकांसाठी एक सकारात्मक बाब ठरली आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी किंवा दागिन्यांच्या खरेदीसाठी सध्याची घसरण ही उत्तम संधी ठरू शकते. तरीही, आगामी काळात जागतिक आर्थिक घडामोडींनुसार हे भाव पुन्हा बदलू शकतात, त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी दैनंदिन दरांवर बारीक लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

24 कॅरेट सोन्याची सद्यस्थिती
शुद्ध सोन्याचे भाव पाहिले तर 24 कॅरेटच्या एका ग्रॅमसाठी आज 16,298 रुपये मोजावे लागत आहेत. 8 ग्रॅम सोन्याचा दर 1,30,384 रुपयांवर पोहोचला आहे. तर 10 ग्रॅम (एक तोळा) सोन्याची किंमत 1,62,980 रुपये झाली आहे. मोठ्या प्रमाणावर म्हणजे 100 ग्रॅम सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी आजचा भाव 16,29,800 रुपये इतका नोंदवला गेला आहे.

हेही वाचा – MPSC Paper Leak: 25 पानांचे PDF, रात्रीच मेसेज अन्…; जिच्यासाठी खटाटोप केला, तिने गरज संपताच नातं तोडलं! प्रेमभंगाच्या रागात पठ्ठ्याने पोलिसांनाच टिप दिली

22 आणि 18 कॅरेट दरातील घसरण
दागिन्यांसाठी प्रामुख्याने वापरल्या जाणाऱ्या 22 कॅरेट सोन्याच्या 1 ग्रॅमचा भाव आज 14,940 रुपये आहे. त्यानुसार 8 ग्रॅमचा दर 1,19,520 रुपये तर 10 ग्रॅमचा भाव 1,49,400 रुपयांवर आला आहे. 100 ग्रॅम 22 कॅरेट सोन्यासाठी आज 14,94,000 रुपये मोजावे लागतील. त्याचप्रमाणे, काहीशा हलक्या आणि बजेटमधील 18 कॅरेट सोन्याचे भावही कमी झाले आहेत. आज 18 कॅरेटच्या 1 ग्रॅमचा दर 12,224 रुपये असून, 8 ग्रॅमसाठी 97,792 रुपये मोजावे लागत आहेत. 10 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याची किंमत 1,22,240 रुपये तर 100 ग्रॅमचा दर 12,22,400 रुपये इतका निश्चित झाला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number