Polymer Currency Notes : संसदेत मोठी घोषणा! लवकरच बाजारात येणार 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा

केंद्र सरकारने देशात 10 आणि 20 रुपये मूल्याच्या प्लास्टिक (पॉलिमर) नोटा आणण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत.

Polymer Currency Notes : संसदेत मोठी घोषणा! लवकरच बाजारात येणार 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा

Polymer Currency Notes : कपडे धुताना किंवा पावसात भिजून कागदी नोटा खराब होणे आणि फाटणे या रोजच्या समस्येवर आता लवकरच कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे. केंद्र सरकारने देशात 10 आणि 20 रुपये मूल्याच्या प्लास्टिक (पॉलिमर) नोटा आणण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. संसदेत दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक टप्प्यात चाचणी म्हणून प्रत्येक मूल्याच्या 1 अब्ज प्लास्टिक नोटा बाजारात आणल्या जाणार आहेत. अर्थमंत्र्यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याची अधिकृत माहिती दिली.

प्लास्टिक नोटांची चाचणी आणि कागदी नोटांचे भविष्य

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट, 1934' च्या कलम 25 अन्वये 10 आणि 20 रुपयांच्या पॉलिमर नोटांची चाचणी घेण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता. सरकारने या प्रस्तावाला हिरवा कंदील दिला असून ही खरेदी प्रक्रिया सध्या प्राथमिक टप्प्यात आहे. त्यामुळे या नोटांचा नेमका निर्मिती खर्च अद्याप निश्चित झालेला नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, नवीन पॉलिमर नोटा आल्या तरी जुन्या कागदी नोटा बंद होणार नाहीत. दोन्ही प्रकारच्या नोटा बाजारात एकाच वेळी चलनात राहतील.

हेही वाचा – Stock Market : शेअर बाजारात मोठी उलथापालथ; Nifty 50 मध्ये BSE ची एन्ट्री, Wipro इंडेक्समधून बाहेर

किरकोळ महागाई दरात घट आणि दिलासा

चलनाला दीर्घायुष्य देण्याच्या निर्णयासोबतच अर्थव्यवस्थेबाबत दिलासा देणारी आकडेवारी संसदेत मांडण्यात आली. देशातील किरकोळ महागाई दरात (CPI) सातत्याने घट नोंदवण्यात आली आहे. 2023-24 मध्ये 5.4 टक्के असलेला महागाई दर 2024-25 मध्ये 4.6 टक्क्यांवर आणि 2025-26 मध्ये थेट 2.1 टक्क्यांपर्यंत खाली आला होता. पश्चिम आशियातील तणाव आणि कच्च्या तेलाच्या किमतींमुळे 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत तो किंचित वाढून 3.9 टक्क्यांवर पोहोचला असला, तरी तो आरबीआयच्या 4 टक्क्यांच्या उद्दिष्टापेक्षा कमीच आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number