Snake at Shah Rukh Khan House : शाहरुख खानच्या ‘मन्नत’मध्ये आढळला 8 फुटी साप; सुरक्षारक्षकांची उडाली धांदल

बंगल्याच्या बागेतील शेडमध्ये अचानक एक अतिशय मोठा धामण जातीचा साप आढळल्याने सुरक्षारक्षकांची आणि कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली.

Snake at Shah Rukh Khan House : शाहरुख खानच्या ‘मन्नत’मध्ये आढळला 8 फुटी साप; सुरक्षारक्षकांची उडाली धांदल

Mannat Snake Rescue:  बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याच्या वांद्रे येथील 'मन्नत' या जगप्रसिद्ध निवासस्थानी सोमवारी एक थरारक घटना घडली. बंगल्याच्या बागेतील शेडमध्ये अचानक एक अतिशय मोठा धामण जातीचा साप आढळल्याने सुरक्षारक्षकांची आणि कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. या बिनबुलाया पाहुण्याला पाहून परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सुरक्षारक्षकांनी तातडीने वन विभाग आणि सर्पमित्रांशी संपर्क साधला.

8 फूट लांबीची धामण सुखरूप ताब्यात; सर्पमित्राचे शिताफीने रेस्क्यू

घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक आणि सर्पमित्र विक्की दुबे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अत्यंत कौशल्याने आणि सुरक्षितरीत्या शेडच्या कोपऱ्यात बसलेल्या त्या अजस्र सापाला पकडले. तपासणीनंतर हा साप 8 फूट लांबीची 'धामण' असल्याचे स्पष्ट झाले. धामण ही प्रजाती बिनविषारी असली तरी तिचा आकार पाहणाऱ्याच्या अंगावर काटा आणणारा होता. सर्पमित्रांनी या सापाला कोणतीही इजा न पोहोचवता सुरक्षित ठिकाणी हलवले.

दुसरा साप गायब; वन विभागाकडून परिसरात कसून शोधमोहीम

या रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान बंगल्यात आणखी एक साप असल्याची शंका कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. मात्र, बचाव पथक येण्यापूर्वीच तो दुसरा साप तेथून निसटून गेला होता. सर्पमित्रांनी मन्नतच्या बागेत, झाडाझुडपांत आणि अडगळीच्या जागांवर बराच वेळ शोध घेतला, परंतु तो साप सापडला नाही. तो सुरक्षितपणे बाहेरील मोकळ्या जागेत निघून गेला असावा, असा अंदाज पथकाने व्यक्त केला आहे.

हेही वाचा – Weather Update: महाराष्ट्राच्या हवामानात मोठी उलथापालथ; कुठे पावसाची रिपरिप तर कुठे उघडीप, जाणून घ्या आजचा ताजा अंदाज

शाहरुख खान कुटुंबीयांसह फ्लॅटमध्ये; सुदैवाने मोठा अनर्थ टळला

विशेष म्हणजे ही घटना घडली तेव्हा अभिनेता शाहरुख खान आणि त्याचे कुटुंबीय बंगल्यात उपस्थित नव्हते. सध्या 'मन्नत'मध्ये नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने शाहरुख खान आपले कुटुंब घेऊन वांद्रे येथीलच एका दुसऱ्या आलिशान फ्लॅटमध्ये राहण्यास गेला आहे. चालू असलेले बांधकाम आणि पावसाळ्यातील दमट हवामानामुळे आश्रयाच्या शोधात हे साप बंगल्याच्या आवारात आले असावेत, असा प्राथमिक निष्कर्ष वन विभागाने काढला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number