Beggar Woman Dies: भीक मागणाऱ्या महिलेचे निधन; होती इतक्या लाखांची मालकीण! घरात 30 गोण्यांमध्ये साठवलेली रक्कम पाहून सगळे अवाक

हूर यांच्या निधनानंतर शेजाऱ्यांनी जेव्हा त्यांच्या घराची पाहणी केली, तेव्हा संपूर्ण घरभर 30 पेक्षा जास्त प्लास्टिकच्या गोण्या कोंबून ठेवलेल्या आढळल्या. या गोण्यांची पाहणी केली असता...

Beggar Woman Dies: भीक मागणाऱ्या महिलेचे निधन; होती इतक्या लाखांची मालकीण! घरात 30 गोण्यांमध्ये साठवलेली रक्कम पाहून सगळे अवाक

Beggar Woman Dies; Cash Found at her House: अंगावर फाटके-तुटके, मळके कपडे घातलेला भिकारी पाहिल्यानंतर लोकांना त्यांच्या परिस्थितीविषयी वाईट वाटते. त्यातही वृद्ध व्यक्तींना भीक मागताना पाहून बहुतेकांना दया येते आणि कुणी दोन रुपये, पाच रुपये, दहा रुपये त्यांच्या हातावर ठेवून मगच पुढे जातात. मात्र, आजपर्यंत अशा अनेक घटना घडल्या आहेत की, ज्यामुळे भिकाऱ्यांजवळचे पैसे पाहून अवाक होण्याची वेळ येते. अशी एका वृद्ध भिकारी महिलेच्या निधनानंतर तिच्याजवळची संपत्ती पाहून शेजारी-पाजाऱ्यांना मोठा धक्का बसला.

लखपती भिकारीण
भाड्याच्या घरात राहणाऱ्या हूर (वय 69) या वृद्ध महिलेचे वृद्धापकाळाने निधन झाले. ही महिला रस्त्यावर आणि मंदिराबाहेर भीक मागून त्या आपला उदरनिर्वाह करत असे. त्यांच्या निधनानंतर शेजाऱ्यांनी जेव्हा त्यांच्या घराची पाहणी केली, तेव्हा संपूर्ण घरभर 30 पेक्षा जास्त प्लास्टिकच्या गोण्या कोंबून ठेवलेल्या आढळल्या. या गोण्यांची पाहणी केली असता, त्यामध्ये 10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटांसह हजारो नाण्यांचा मोठा साठा आढळून आला. कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यातील गुठालू भागात ही लखपती भिकारीण राहत होती.


 

हूर यांच्या निधनानंतरची परिस्थिती आणि पैशांच्या मोजदाद
शेजाऱ्यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने घरात मिळालेल्या पैशांची मोजदाद केली असता काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. हूर यांच्या घरात प्लास्टिकच्या 30 हून अधिक गोण्यांमध्ये एकूण 8,40,000 रुपयांची रोख रक्कम आणि नाणी सापडली. हूर या अविवाहित असून बिनधास्त आयुष्य जगत होत्या. त्या त्यांच्या बहिणीसोबत राहत होत्या. दोन्ही बहिणींनी लग्न केले नव्हते. 2 वर्षांपूर्वी बहिणीच्या मृत्यूनंतर हूर त्या घरात एकट्याच राहत होत्या. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या खोलीत सापडलेली ही रक्कम हूर यांच्या शेजाऱ्यांनी दोन भावांकडे सुपूर्द केली. आता त्या पैशांची त्यांच्या दोन भावांमध्ये वाटणी झाली आहे. यातील एका भावाला 6 लाख रुपये तर दुसऱ्या भावाला 2 लाख 40 हजार रुपये मिळाले. 2 लाख 40 हजार रुपये मिळालेल्या भावाने ती संपूर्ण रक्कम एका मशिदीला दान केली.

हेही वाचा – Viral Story: ‘बुटका, जाडा..’ कॅफेच्या बिलावर टेबल क्रमांक किंवा ग्राहकाच्या नावाऐवजी शारीरिक वर्णन; सोशल मीडियावर संताप

भीक मागून साठवलेली रक्कम पाहून स्थानिक नागरिक अवाक
आयुष्यभर अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत भीक मागून जगणाऱ्या या वृद्ध महिलेकडे एवढी मोठी रक्कम जमा असेल, याची कल्पना तिच्या शेजाऱ्यांनाही नव्हती. हूर यांच्या घरातील नोटा आणि नाणी मोजतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, ही बातमी संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number