नाशिकमध्ये कामावर रुजू न होणारे १७ एसटी कर्मचारी बडतर्फ

राज्यात मागील काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. एसटी महामंडळ राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. मात्र विलिनीकरणाचा विचार डोक्यातून काढून टाका, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनादरम्यान केले. तरीही एसटी कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे कामावर रुजू न होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. नाशिकमधील एसटी संपाचा […]

नाशिकमध्ये कामावर रुजू न होणारे १७ एसटी कर्मचारी बडतर्फ

राज्यात मागील काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. एसटी महामंडळ राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. मात्र विलिनीकरणाचा विचार डोक्यातून काढून टाका, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनादरम्यान केले. तरीही एसटी कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे कामावर रुजू न होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे.

नाशिकमधील एसटी संपाचा तिढा कायम असून, कामावर रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर एसटी प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. नाशिकमधील पिंपळगाव एसटी आगारातील १७ एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. तसेच १० कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. तर ४५ संपकारी कर्मचाऱ्यांवर आरोपपत्र निश्चित  करण्यात आले आहे.

कर्मचाऱ्यांच्या एसटी विलिनीकरणाच्या मागणीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत भाष्य केले. एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण होईल हे कर्मचाऱ्यांनी डोक्यातून काढून टाकावे, असे अजित पवार म्हणाले. राज्य सरकराने कर्मचाऱ्यांचे वतेनवाढ करण्याचा निर्णय घेतला. तरिही एसटी कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number